कोल्हापूर: गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर राजकीय समीकरणांमध्ये अत्यंत नाट्यमय आणि अनपेक्षित वळण पाहायला मिळत आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष आणि महायुतीचे प्रमुख चेहरे असलेले अरुण डोंगळे हे पिछाडीवर फेकले गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. डोंगळे यांच्यासोबतच महायुतीचे अमर पाटील यांनाही पिछाडीचा मोठा सामना करावा लागत आहे.

तर, तिसऱ्या फेरीअखेर मोठी उलथापालथ झाली आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील समविचारी आघाडीच्या ८ उमेदवारांनी आघाडी मिळवली आहे. तीन फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून चार फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. यामध्ये कोणाला कौल मिळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या ८ उमेदवारांनी भक्कम आघाडी मिळवल्याने महायुतीच्या गोटात कमालीची चिंता पसरली आहे.
विशेष म्हणजे, मतदानापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांच्याबाबत उघडपणे व्यक्त केलेली नाराजीच या पराभवाच्या छायेला कारणीभूत ठरली का, अशी जोरदार चर्चा आता मतपेटीतील कलांनंतर सुरू झाली आहे.महायुतीच्या नेत्यांनी ही निवडणूक २५-० अशी जिंकू असा दावा केला होता. मात्र, क्लीन स्वीप होणार नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील समविचारी आघाडीच्या उमेदवारांकडून निकरांची झुंज सुरू आहे. मतमोजणीच्या पहिल्या कलात अवघे तीन उमेदवार आघाडीवर होते. आता, तिसऱ्या फेरी अखेर सतेज पाटलांच्या पॅनेलमधील ८ उमेदवार आघाडीवर आहेत.
सर्वसाधारण गटात आता महायुतीचे १२ आणि समविचारी आघाडीचे ८ उमेदवार आघाडीवर आहेत.आमदार सतेज पाटील यांची समविचारी आघाडी आणि महायुती समर्थित आघाडी यांच्यातील या लढतीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून कोल्हापुरातील रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहेकोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या मतमोजणीत तिसऱ्या फेरीनंतर कोणती राजकीय उलथापालथ झाली?तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीनंतर गोकुळ दूध संघ निवडणुकीत एक नाट्यमय बदल झाला असून, सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीच्या ८ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तसेच महायुतीचे प्रमुख चेहरे असलेले अरुण डोंगळे आणि अमर पाटील पिछाडीवर पडले आहेत।
महायुतीला कडवी झुंज, तिसऱ्या फेरीनंतर कोणाला किती मते?
- पाटील राहुल पांडुरंग 9802 नरके चेतन अरुण 9793 मंडलिक विरेंद्र संजय 9784 तायशेटे अभिजित प्रभाकर 9625 पाटील चंद्रकांत शशिकांत आनंद 9486 घाटगे अबरीशसिंह संजय 9427 नरके आजिनाथ श्रीकांत 9308 देशाई मदन बाबुराव 8979 पाटील रणजितसिंह दिलीपराव 88910 पाटील राजेश नरसिंगराव 88311 पाटील रणजितसिंह कृष्णराव 88212 चौगले किरण बाबुसो 86113 पाटील अजित पांडुरंग 85014 पाटील युवराज दत्ताजीराव 84315 पाटील सतीश भिमगोंडा 84116 पाटील आर्यसिंह यशवंत 83917 पाटील दीपक भरसू 83618 गुरबे विद्याधर बाबुराव 83619 गायकवाड कर्णसिंह संजयसिंह 83420 पाटील आबाजी उर्फ विश्वासराव 83321 पाटील संभाजी रंगराव 82022 डोमळे अरुण गणपतराव 81823 चराटी अशोक काशिनाथ 81524 देशाई राहुल बजरंग 81225 चौगले बाबासाहेब श्रीपती 804










