No Result
View All Result
सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे नुकताच बिगुल वाजले असून, निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, इच्छुकांमध्ये हालचालींना वेग आला आहे. अर्ज घेण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल सुरेश हसापूरे सह २१९ इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत.
त्यामुळे बँकेच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिसाद दिला. २१९ अर्जांची उचल झाल्याने निवडणुकीतील संभाव्य चुरस आणि इच्छुकांची संख्या याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली आहे..
आगामी काळात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यांनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे
अर्ज खरेदीत मातब्बर नेत्यांचा समावेश
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक करिता सोमवारी पहिल्या दिवशी अर्ज खरेदी करणार्यांमध्ये आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील,माजी आमदार दिलीप माने, जयवंतराव जगताप, नगरसेवक जयकुमार माने, जि.प सदस्य डॉ . पृथ्वीराज माने, बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील, माजी संचालक सुरेश हसापुरे, काँग्रेसचे भारत जाधव, मनीष देशमुख, कल्याणराव काळे, अजिंक्यराणा पाटील, विक्रांत पाटील, सिद्धाराम चाकोते, सिद्धेश्वर अवताडे, बबन अवताडे, सुशील अवताडे, श्रीदीप हसापुरे, मारुती लवटे आणि शंभूराजे जगताप, अतुल पवार, बाळासाहेब माळी आदींचा समावेश आहे.
No Result
View All Result