Wednesday, November 4, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मी पुन्हा एकदा सांगतो प्रवाशांना विशेष सुविधा द्या ; मंत्री प्रताप सरनाईक

Solapur Mirror by Solapur Mirror
November 3, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मी पुन्हा एकदा सांगतो प्रवाशांना विशेष सुविधा द्या ; मंत्री प्रताप सरनाईक
0
SHARES
21
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आवश्यक सुविधांच्या पूर्ततेवर विशेष भर द्यावा, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिले.

मंत्री सरनाईक यांनी आज सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन तेथील स्वच्छतागृहे, पाणपोई आणि इतर प्रवासी सुविधांची पाहणी केली. बसस्थानकात झालेल्या सुधारणांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, स्वच्छतेच्या बाबतीत अद्याप सुधारणा करण्यास मोठा वाव असून, बसस्थानक परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षतेने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील प्रवाशांशी थेट संवाद साधला. एसटीच्या नवीन बसेसबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशीच दर्जेदार सेवा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी प्रवाशांनी स्थानिक समस्याही मंत्री महोदयांसमोर मांडल्या. दोन मुख्य शहरा दरम्यान विनावाहक सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली. प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचनांची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी संबंधित एसटी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या समाधानासाठी एसटी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांना उत्तम सुविधा, स्वच्छ बसस्थानके आणि समाधानकारक प्रवास अनुभव देणे हे एसटी महामंडळाचे प्राधान्य आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी स्थानिक प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले.

Tags: (एसटी)एसटी महामंडळमंत्री प्रताप सरनाईकसोलापूर मध्यवर्ती बसस्थानक
Previous Post

सहकार वाचला तरच उसाला योग्य भाव; सिद्धेश्वरच्या यशासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवा!

Next Post

प्रवाशांची गर्दी अन् रेल्वेची कोंडी; सोलापूरकरांना विशेष गाड्यांची प्रतीक्षा!

Related Posts

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!
सोलापूर जिल्हा

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

November 4, 2026
भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!
सोलापूर जिल्हा

भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!

November 4, 2026
समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!
सोलापूर जिल्हा

समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!

November 4, 2026
जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सवा’चा शुभारंभ

November 1, 2026
Next Post
प्रवाशांची गर्दी अन् रेल्वेची कोंडी; सोलापूरकरांना विशेष गाड्यांची प्रतीक्षा!

प्रवाशांची गर्दी अन् रेल्वेची कोंडी; सोलापूरकरांना विशेष गाड्यांची प्रतीक्षा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

November 4, 2026
भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!

भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!

November 4, 2026
समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!

समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!

November 4, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In