Wednesday, November 4, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!

Solapur Mirror by Solapur Mirror
November 4, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर, : एकीकडे ढोल-ताशांचा गजर, भगव्या ध्वजांची फडकणारी गर्दी आणि ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव, देश बचाव’च्या घोषणांनी बुधवारी सोलापूर शहर दणाणून गेले; तर दुसरीकडे याच विराट राजकीय शक्तिप्रदर्शनामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार, माजी आमदार, महापालिका आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. मात्र, या मोर्चामुळे शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. विशेष म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज चौकात रुग्णवाहिकेलाही वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे राजकीय शक्तिप्रदर्शनाच्या उत्साहात सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

देशातील लोकशाही व्यवस्था, संविधानिक संस्था आणि निवडणूक प्रक्रियेबाबत विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. विरोधकांच्या कथित अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून भाजपने सोलापुरात आपली संघटनात्मक ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला.

मोर्चासाठी दुपारी चार वाजताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. शहराच्या विविध भागांतून मोटारसायकल रॅलीद्वारे कार्यकर्ते चौकात दाखल होत होते. ढोल-ताशे, बँजो पथके, भगवे ध्वज आणि घोषणाबाजीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने मोर्चाला सुरुवात झाल्याने वाहतुकीवरील ताण अधिकच वाढला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सरस्वती चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, नवी पेठ, बाळीवेस तसेच जुनी पोलीस लाईन ते कल्पना टॉकीज या प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना काही अंतर पार करण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत होती. अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती, तर काही मार्गांवर वाहनांची चाके अक्षरशः थांबली होती.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रमुख मार्गांवर बॅरिकेटिंग करून वाहतुकीत बदल केले होते. बाळीवेस ते मधला मारुती या प्रमुख व्यापारी मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. मोर्चात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी शहराबाहेरील चार ठिकाणी स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अनेक कार्यकर्त्यांची वाहने थेट छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पोहोचल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडली. दिवाळीच्या खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आधीच नागरिकांची वर्दळ वाढलेली असताना मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूककोंडीचा मोठा फटका खरेदीदारांना बसला. बाजारपेठेत पोहोचण्यासाठी तसेच खरेदी करून घरी परतण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. व्यापारी पेठेतील वाहतुकीवरील निर्बंधांमुळे ग्राहकांचीही गैरसोय झाली.

या विराट मोर्चात आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, राजन पाटील, दिलीप माने, नरसिंग मेंगजी, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, दीपक साळुंखे-पाटील, रोहिणी तडवळकर, शहाजी पवार, कांचना यन्नम, रंजिता चाकोते, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भाजप संविधानाचा सन्मान करणारा पक्ष : आ. सचिन कल्याणशेट्टी
भारतीय जनता पार्टी ही संविधानाचा सन्मान करणारी आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारी संघटना आहे. देशाच्या विकासाच्या वाटचालीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना जनतेने ओळखले पाहिजे. या मोर्चाच्या माध्यमातून भाजपची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.


………………………….

विकासासाठी स्थिरता आणि शांतता महत्त्वाची : आ. देवेंद्र कोठे
लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. देशाच्या प्रगतीसाठी स्थिरता, शांतता आणि विकासाची दिशा महत्त्वाची आहे. भाजपचे कार्यकर्ते जनतेमध्ये जाऊन या अभियानाचा उद्देश स्पष्ट करतील, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.

शक्तिप्रदर्शन भाजपचे; मनस्ताप सोलापूरकरांना!
मोर्चाच्या निमित्ताने भाजपने शहरात मोठे राजकीय शक्तिप्रदर्शन केले. मात्र, त्याची किंमत सर्वसामान्य वाहनधारक आणि दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना वाहतूककोंडीच्या स्वरूपात मोजावी लागली. प्रमुख बाजारपेठांकडे जाणाऱ्या मार्गांवर निर्बंध, चौकाचौकांत वाहनांच्या रांगा आणि पर्यायी मार्गांवरील वाढलेली गर्दी यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. राजकीय कार्यक्रमांचा उत्साह कायम ठेवताना सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली.

Tags: आमदार देवेंद्र कोठेएकनाथ शिंदेजिल्हा परिषददेवेंद्र फडणवीसपालकमंत्री जयकुमार गोरेराजकारणशक्तिप्रदर्शनसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!

Next Post

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

Related Posts

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!
सोलापूर जिल्हा

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

November 4, 2026
समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!
सोलापूर जिल्हा

समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!

November 4, 2026
जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सवा’चा शुभारंभ
सोलापूर जिल्हा

जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सवा’चा शुभारंभ

November 3, 2026
प्रवाशांची गर्दी अन् रेल्वेची कोंडी; सोलापूरकरांना विशेष गाड्यांची प्रतीक्षा!
सोलापूर जिल्हा

प्रवाशांची गर्दी अन् रेल्वेची कोंडी; सोलापूरकरांना विशेष गाड्यांची प्रतीक्षा!

November 3, 2026
मी पुन्हा एकदा सांगतो प्रवाशांना विशेष सुविधा द्या ; मंत्री प्रताप सरनाईक
सोलापूर जिल्हा

मी पुन्हा एकदा सांगतो प्रवाशांना विशेष सुविधा द्या ; मंत्री प्रताप सरनाईक

November 3, 2026
सहकार वाचला तरच उसाला योग्य भाव; सिद्धेश्वरच्या यशासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवा!
सोलापूर जिल्हा

सहकार वाचला तरच उसाला योग्य भाव; सिद्धेश्वरच्या यशासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवा!

November 1, 2026
Next Post
स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

November 4, 2026
भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!

भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!

November 4, 2026
समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!

समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!

November 4, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In