Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उज्ज्वला थिटेचा अर्ज बाद

Solapur Mirror by Solapur Mirror
November 18, 2025
in सोलापूर जिल्हा
0
अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उज्ज्वला थिटेचा अर्ज बाद
0
SHARES
155
VIEWS

सोलापूर : अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी बंदूकधाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज भरणाऱ्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालेला आहे. उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी अर्ज भरला होता. मात्र छाननीत त्यांचाच अर्ज बाद झाल्याने अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अर्ज बाद झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडून राजन पाटील (मालक) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले.

उज्ज्वला थिटे यांना अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिल्यानंतर त्या मागील काही दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांनी उमेदवारी भरू नये, येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप नेते राजन पाटील प्रयत्न करत असल्याचा आरोप थिटे यांनी केला. अर्ज भरायला जातानाही रस्त्यावर राजन पाटील यांनी जागोजागी लोकांना उभे करून आपल्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे थिटे म्हणाल्या. तसेच राजन पाटील यांच्याकडून आपल्यावर हल्ला केला जाऊ शकतो, अशी भीती थिटे यांनी व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी पोलीस संरक्षण देखील मागितलं होतं. बंदूकधारी व्यक्ती सोबतीला घेऊन त्यांनी अर्ज भरला होता.

जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थेटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे याच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला

अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे यांच्या अर्जावर पाच हरकती घेतल्या. उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचक यांची सही नव्हती. त्यांच्या अर्जावर प्रभाग क्रमांक चुकीचा होता. त्यांचा मतदार यादीतील अनुक्रमांक चुकीचा होता. त्यांच्या वयाचा पुरावा त्यांनी दिलेला नव्हता. सूचक यांचा अनुक्रमांक चुकीचा होता, अशा पाच हरकती सरस्वती शिंदे यांनी घेतल्या होत्या. या हरकतींच्या अनुषंगाने आम्ही पडताळणी केली असता, त्यावेळी तीन दोष आम्हाला तांत्रिक स्वरूपाचे दिसून आले. किरकोळ हरकती आम्ही विचारात घेतले नाही. सूचकाची सही नव्हती, ही विचार करण्याजोगी हरकत होती. प्रत्येक अर्जावर उमेदवाराची सही आणि सूचकाची सही बंधनकारक असते. त्यामुळे आम्ही त्यांचा अर्ज बाद ठरवला.

Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका धोक्यात; OBC च्या 50% आरक्षण मर्यादेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले

Next Post

खळबळजनक ;दक्षिणचे विस्तार अधिकारी संदिप खरबस अखेर निलंबित

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
खळबळजनक ;दक्षिणचे विस्तार अधिकारी संदिप खरबस अखेर निलंबित

खळबळजनक ;दक्षिणचे विस्तार अधिकारी संदिप खरबस अखेर निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025