सोलापूर: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘CTET’ (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) देणाऱ्या जिल्ह्यातील ३,२४५ शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सवलत देण्यात आली असून त्यांचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात आले आहेत.
निवडणूक कामासाठी जिल्ह्यात एकूण १३,९६४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. ज्या शिक्षकांची CTET परीक्षा आहे, अशा ३,२४५ शिक्षकांनी विनंती केल्यानंतर प्रशासनाने त्यांचे आदेश रद्द केले आहेत. या निर्णयामुळे परीक्षार्थी शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता त्यांच्या जागी पर्यायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
CTET परीक्षेला बसलेल्या शिक्षकांचे आदेश व रद्द करण्यात आलेल्या शिक्षकांची आकडेवारी..











