Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

Solapur Mirror by Solapur Mirror
July 11, 2026
in Uncategorized
0
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

“सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनची यंदाची निवडणूक ६ ते २० जुलैदरम्यान पार पडण्याची शक्यता असून, त्याआधी जूनअखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. सुमारे १६०० ते १८०० मतदार असलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेंद्र फताटे आणि ॲड. संतोष पाटील यांची नावे सध्या चर्चेत असून, निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील वर्षी १६ जून रोजी निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. १८ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती, तर ३० जून रोजी मतदान पार पडले होते. त्या निवडणुकीत ॲड. बाबासाहेब जाधव यांनी विजय मिळविला होता. सोलापूर बार असोसिएशनचे सदस्य असलेले आणि जिल्हा न्यायालयात वकिली करणारे वकील या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतात. यंदा १६०० ते १८०० वकील मतदार असण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आतापासूनच संपर्क आणि भेटीगाठी वाढविल्याचे चित्र आहे.

ॲड. राजेंद्र फताटे यांनी यापूर्वीही बार असोसिएशनची निवडणूक लढविली आहे. यंदा त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा ॲड. संतोष पाटील यांना मिळू शकतो, अशीही वर्तुळात चर्चा आहे. मात्र, अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून २० जुलैपूर्वी नव्या अध्यक्षाची निवड करण्याचे नियोजन असल्याची माहिती बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

कार्यक्रमानंतर निवडणुकीची रणधुमाळी
सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील सर्व वकील बांधवांसाठी ५ जुलै रोजी कायदेविषयक चर्चासत्र आयोजित केले आहे. त्यानंतर पुढील १५ दिवसांत सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक पार पडेल.

ॲड. बाबासाहेब जाधव, अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन

५ जुलैला हुतात्मा स्मृती मंदिरात कायदेविषयक चर्चासत्र
सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने ५ जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश ॲड. भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय जोशी, न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.”
.

Previous Post

ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूटमध्ये ; डीसीपी वृष्टी जैन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Next Post

नेहरूनगरातील सुशीलकुमार शिंदे कॉलेजात शिष्यवृत्ती घोटाळा उघड..

Related Posts

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’;  नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!
Uncategorized

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’; नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!

August 6, 2026
सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!
Uncategorized

सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!

July 28, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
Next Post
नेहरूनगरातील सुशीलकुमार शिंदे कॉलेजात शिष्यवृत्ती घोटाळा उघड..

नेहरूनगरातील सुशीलकुमार शिंदे कॉलेजात शिष्यवृत्ती घोटाळा उघड..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In