Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

Solapur Mirror by Solapur Mirror
June 18, 2026
in Uncategorized
0
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांना सोलापूर दौऱ्यावर पाठवले आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) एकही मत वाया जाऊ नये, यासाठी चिवटे यांनी जिल्ह्यात ठाण मांडत निवडणूक नियोजनाला वेग दिला आहे. मंगेश चिवटे यांनी उमेदवार राजाभाऊ राऊत यांच्यासमवेत जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व मतदारांच्या तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी संवाद साधून महायुतीच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.

निवडणूक नियोजनासाठी मंगेश चिवटे यांनी आमदार अभिजित पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद गटनेते चरणराज चवरे, अनिल सावंत (शिवसेना), भगीरथ भालके, नगरसेवक अमोल शिंदे, रमेश बारसकर, मनसेचे दिलीप बापू धोत्रे आणि माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती, मतदारांचे गणित आणि विजयाची रणनीती यावर विचारविनिमय करण्यात आला.

या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेशही संबंधित नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. “राजाभाऊ राऊत हे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,” असे आवाहन शिंदे यांच्या वतीने करण्यात आले. दरम्यान, मंगेश चिवटे हे मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत असतानाच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार धैर्यशील माने यांच्याशी भ्रमणध्वनीवरून थेट संवादही घडवून आणत आहेत. मतदार आणि कार्यकर्त्यांशी वरिष्ठ नेत्यांचा थेट संपर्क साधला जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात महायुतीची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Previous Post

विरोधकांची स्वतःच ‘अदृश्य’ होण्याची वेळ आलीय; आमदार सचिन कल्याणशेट्टींचा थेट टोला!

Next Post

यूजर चार्जेस समितीत दिलीपराव माने यांची निवड

Related Posts

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’;  नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!
Uncategorized

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’; नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!

August 6, 2026
सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!
Uncategorized

सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!

July 28, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
Next Post
यूजर चार्जेस समितीत दिलीपराव माने यांची निवड

यूजर चार्जेस समितीत दिलीपराव माने यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In