अपघातात चेहरा झाला चेंदामेंदा, मोबाईल रिंगने तरुणाला ओळखले
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुचाकीच्या मद्रे ते आहेरवाडी रस्त्यावरील कोरे वस्ती परिसरात झालेल्या अपघातात २५ वर्षाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमनाथ हिरू चव्हाण (वय २५, रा. मद्रे, ता. दक्षिण सोलापूर) असे त्या तरुणाचे नाव आहे. ही घटना दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.
अपघात एवढा भीषण होता की, चेहरा पूर्ण चेंदामेंदा झाला असून, ओळख पटविणेही मुश्किल झाले होते. मद्रे गावचे पोलीस पाटील अनिल हक्के तीच व्यक्ती आहे का म्हणून कॉल केला. मृत तरुणाच्या खिशातच रिंग मृत तरुणाला बेशुद्ध अवस्थेत सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.वाजल्याने त्याची ओळख पटली.
सोमनाथ चव्हाण हे काल रात्री दुचाकीवरून घराकडे प्रवास करत असताना रस्त्याच्या कॉर्नरला नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल एस.व्ही. कुवर यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत तरुणाला बेशुद्ध अवस्थेत सोलापूर येथील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृत सोमनाथ चव्हाण यांच्या पश्चात आई-वडील, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.










