सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोलापूरमध्ये शिवप्रेमींसाठी एका विशेष सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रभर गाजत असलेला ‘स्वराज्य आख्यान’ हा भव्य सांगीतिक कार्यक्रम येत्या १७ फेब्रुवारी रोजी सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात रंगणार आहे. प्रशासकीय आणि सांस्कृतिक संगम महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वराज्य आख्यान’ हे एक नव्याने लिहिलेले, स्वरचित आणि सांगीतिक थाटात सादर होणारे महानाट्य असून, या माध्यमातून शिवरायांचा गौरवशाली इतिहास उलगडला जाणार आहे.
”अस्तित्व मेकर्स फाउंडेशन” या संस्थेद्वारे या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या मातीतील कला आणि इतिहासाचा हा अभूतपूर्व संगम पाहण्यासाठी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
दिनांक: मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६
वेळ: सायंकाळी ६:३० वाजता
स्थळ: हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर
प्रवेश: सर्व शिवप्रेमींसाठी विनामूल्य (खुला)











