सोलापूर : सोलापूरच्या सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय असणारी सोलापूर जनता सहकारी मल्टिस्टेट बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून नामनिर्देशन पत्र दाखल प्रक्रिया सुरू झाली आहे.जनता बँक ही मल्टिस्टेट बँक असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.

तर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. नामनिर्देशन अर्ज विक्री आणि स्वीकृती, छाननी, हरकत, सुनावणी, अंतिम यादी, चिन्ह वाटप ही सर्व प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयात चालणार आहे.मागील निवडणूक किशोर देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली जनता बँकेने लढवली होती.
त्यावेळी भाजपच्या आताच्या शहराध्यक्ष रोहिणी तळवलकर यांनी स्वतंत्र परिवर्तन पॅनल उभे केले होते. पण देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने निर्विवाद वर्चस्व राखले होते. यावेळी निवडणूक कशी होणार हे अजून तरी स्पष्ट झाले नाही.
अशी आहे निवडणूक प्रक्रिया
3 मार्च ते 7 मार्च अर्ज विक्री आणि स्वीकृती
9 मार्च रोजी छाननी,
10 मार्च माघार त्याच दिवशी अंतिम यादी
17 मार्च रोजी मतदान20 मार्च रोजी मतमोजणी










