सोलापूर : प्रदेशाध्यक्ष प्रा डॉ बापूसाहेब आडसुळ राज्याचे संविधनशील उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य मदत कक्षाचे राज्याचे प्रमुख आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारी शिक्षक सेना म्हणजे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य या शिक्षक सेनेच्या माध्यमातून राज्यांमधील सर्व शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमधील निवडणूक लढविणार असल्याचे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष,प्रा डॉ बापूसाहेब आडसुळ यांनी जाहीर केले आहे

अनाथांचा नाथ एकनाथ यांनी नेहमी स्वाभिमाना बाणा उचलून कार्यकर्त्यांना स्वाभिमानी राहण्याचे कानमंत्र दिले आहेत म्हणूनच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचा जन्म झाला या माध्यमातून राज्यांमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे वेळोवेळी एकनाथ शिंदे शिक्षक आणि पदवीधरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यामध्ये टप्पा वाढ योजना असो शिक्षकांना कॅशलेस योजना असो जुनी पेन्शन योजना असो अशा सर्वच बाबींना एकनाथ शिंदे यांचे नेहमी एक पाऊल पुढे असते त्यामुळे सर्वांच्या आग्रहास्तव राज्यामधील सर्व शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ लढविणार असल्याचे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष, सदस्य पुणे बोर्ड सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई प्रा डॉ बापूसाहेब आडसूळ यांनी नुकतंच एका पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे त्यामुळे राज्यामधील सर्व पदवीधर आणि शिक्षकांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण होत आहे








