सोलापूर : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर या संघटनेचा 78 वा स्थापना दिवस 13 एप्रिल रोजी असून यंदा निमा सोलापूर शाखेकडून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, पुरस्कार वितरण यासह विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी आणि कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण नन्नवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निमा स्थापना दिनानिमित्त रविवार दि. 12 एप्रिल रोजी डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर सायंकाळी 6 वाजता वैद्यकीय क्षेत्रात व संघटनेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मान्यवर डॉक्टराना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल , प्रसिद्ध उद्योजिका डॉ. सुहासिनी शहा या उपस्थित राहणार आहेत.

सोमवार दि. 13 एप्रिल रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गाव येथे आरोग्य मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच विडी घरकुल परिसरातील गरजू रुग्णांसाठी डॉ. जिड्डीमनी यांच्या कमल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमा सोलापूचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ.साहेबराव गायकवाड, डॉ.रविराज गायकवाड, डॉ. सुभाष भांगे, डॉ. नितीन बलदवा, डॉ. उत्कर्ष वैद्य, डॉ. अभिजीत पुजारी, डॉ. श्रुती मराठे, डॉ पल्लवी भांगे , डॉ अश्विनी देगांवकर, डॉ. राजश्री मठ, डॉ. योगेश उडगीकर आदी उपस्थित होते.
हे आहेत पुरस्काराचे मानकरी
- यावेळी धन्वंतरी पुरस्कार – डॉ. विजय आरकाल. (ऍलोपॅथी), वैद्य राघवेंद्र नादरगी,(आयुर्वेद ),
- निमारत्न पुरस्कार – डॉ. धनंजय कुलकर्णी, डॉ.अनिल पत्की,
- स्मृती विशेष पुरस्कार – डॉ. माधव गुंडेटी,
- निमा सुपरस्टार पुरस्कार – डॉ. अमोल माळगे , डॉ.अश्विनी देगांवकर,
- निमा शायनिंग स्टार पुरस्कार -डॉ. सचिन बोंगरगे, डॉ.वैजनाथ स्वामी,
- निमा रायझिंग स्टार पुरस्कार -डॉ. सुनील खट्टे आणि डॉ.आदिल मुल्ला,
- निमा सोलापूर विशेष गौरव पुरस्कार – डॉ.राजलक्ष्मी गायकवाड ,डॉ. मंजिरी कुलकर्णी आणि डॉ. विलास सरवदे आदी मान्यवरांना रविवारी सन्मानित करण्यात येणार आहे.










