Saturday, April 11, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

राजेश भोई by राजेश भोई
April 10, 2026
in महाराष्ट्र, राजकारण, सोलापूर जिल्हा
0
‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
0
SHARES
7
VIEWS

पुणे ; राज्याचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असून, त्यांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या करूणा शर्मा, अभिजित बिचुकले यांच्यासह सर्वच अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, असे रोखठोक मत ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.१०) व्यक्त केले.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार मागे घेऊन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा मान राखला आहे. या निर्णयाचे पाटील यांनी स्वागत केले. एखाद्या मोठ्या नेत्याच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची एक अलिखित परंपरा राहिली आहे. काँग्रेसने ही संवेदनशीलता दाखवली, मात्र रिंगणात उरलेल्या इतर उमेदवारांनी केवळ प्रसिद्धीसाठी अर्ज भरला आहे, असा दावा पाटील यांनी केला.

अजितदादांनी बारामती आणि महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला, म्हणजेच सुनेत्रा वहिनींना बिनविरोध निवडून देणे हाच दादांना खऱ्या अर्थाने दिलेला सन्मान ठरला असता. दुर्दैवाने, काही उमेदवारांनी केवळ चर्चेत राहण्यासाठी अर्ज मागे घेतले नाहीत, असे पाटील म्हणाले.

बारामतीमधील स्थानिक वातावरण पाहता सुनेत्रा पवार यांना सर्वच थरांतून मोठी सहानुभूती आणि पाठिंबा मिळत आहे. विरोधात असलेल्या २३ उमेदवारांकडे ना कोणते ठोस मुद्दे आहेत, ना जनाधार. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांचा कल स्पष्ट असून, इतर सर्व उमेदवारांना अनामत रक्कम वाचवणेही कठीण जाणार असल्याचे चित्र पाटील यांनी अधोरेखित केले. ही निवडणूक केवळ औपचारिकता उरली असून, बारामतीची जनता दादांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून सुनेत्रा पवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला

Tags: अजित पवारआमदार देवेंद्र कोठेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराजकारण
Previous Post

गावात ५ लग्ने ठरवा, सोहळा आम्ही करू; आ. सुभाष देशमुखांच्या संकल्पाला बोरुळची साथ

Next Post

हद्दवाढ भागातील नागरिकांना दिलासा मिळणार; गुंठेवारी विकास आणि मोजणी प्रक्रियेला येणार गती

Related Posts

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.
सोलापूर जिल्हा

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.

April 11, 2026
“न्यायदेवतेच्या दरबारात सोलापूरचा डंका! JMFC परीक्षेत प्रथमेश शिंदे यांचे देदीप्यमान यश; वकील वर्गात आनंदाचे वातावरण.”

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात
सोलापूर जिल्हा

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात

April 10, 2026
सोलापूरच्या खुन प्रकरणातील संशयिताला उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या खुन प्रकरणातील संशयिताला उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

April 10, 2026
Next Post
हद्दवाढ भागातील नागरिकांना दिलासा मिळणार; गुंठेवारी विकास आणि मोजणी प्रक्रियेला येणार गती

हद्दवाढ भागातील नागरिकांना दिलासा मिळणार; गुंठेवारी विकास आणि मोजणी प्रक्रियेला येणार गती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.

April 11, 2026
चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

April 11, 2026
“न्यायदेवतेच्या दरबारात सोलापूरचा डंका! JMFC परीक्षेत प्रथमेश शिंदे यांचे देदीप्यमान यश; वकील वर्गात आनंदाचे वातावरण.”

“न्यायदेवतेच्या दरबारात सोलापूरचा डंका! JMFC परीक्षेत प्रथमेश शिंदे यांचे देदीप्यमान यश; वकील वर्गात आनंदाचे वातावरण.”

April 10, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025