Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

गावात ५ लग्ने ठरवा, सोहळा आम्ही करू; आ. सुभाष देशमुखांच्या संकल्पाला बोरुळची साथ

Solapur Mirror by Solapur Mirror
April 10, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
गावात ५ लग्ने ठरवा, सोहळा आम्ही करू; आ. सुभाष देशमुखांच्या संकल्पाला बोरुळची साथ
0
SHARES
7
VIEWS

आमदार सुभाष देशमुखांच्या उपस्थितीत बोरुळमध्ये सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

सोलापूर ; बोरुळ गावात एकूण 80 कुटुंबे असून त्यापैकी 45 कुटुंबांतील मुला-मुलींचे सामुदायिक विवाह झाले आहेत. त्यामुळे बोरुळ गाव सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरल्याचे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरुळ येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास फाउंडेशनचे संस्थापक आमदार सुभाष देशमुख स्वतः उपस्थित राहून नवदांपत्यांना आशीर्वाद दिले व विवाह विधी पार पाडले. या वेळी हजारो वर्‍हाडी मंडळींची उपस्थिती होती. बोरुळ गावात लोकमंगल फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला हा सलग चौथा सामुदायिक विवाह सोहळा ठरला. आमदार देशमुख यांनी ज्या गावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विवाह निश्चित होतील, त्या गावात सामुदायिक विवाह आयोजित करण्याचा संकल्प केला असून, त्याच अनुषंगाने बोरुळमध्ये दरवर्षी हा उपक्रम राबविला जात आहे.

यंदाच्या सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध झाली. आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतः कन्यादान करत नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी वधू-वरांना कपडे व संसारोपयोगी साहित्य, बूट चप्पल,सुवर्ण मनी, मंगळसूत्र,चांदीची जोडवी भेट म्हणून देण्यात आले. सनई-चौघड्यांच्या निनादात आणि उत्साही वातावरणात हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अतुल गायकवाड, पंचायत समिती सदस्य पंचप्पा धनशेट्टी, होटगी पंचायत समिती सदस्या अंबिका पाटील, उत्तरचे तालुकाध्यक्ष राम जाधव, लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर, उत्तम शिंदे, घोडके, मुख्याध्यापक तेगीनकेरी, द्राक्ष बागायतदार गुरुबसप्पा म्हेत्र, राहुल वंजारे, सागर धुळवे, शिवानंद पुजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बरूळचा आदर्श इतर गावांनी घ्यावा
सामुदायिक विवाह सोहळा ही एक सामाजिक चळवळ असून, विविध गावांतील नागरिकांनी या चळवळीत सहभागी होऊन ती अधिक व्यापक करावी. बरूळ गावाची प्रेरणा इतर गावांनीही घ्यावी असे आवाहन आ. देशमुख यांनी करत लग्नासाठी सावकारांकडून कर्ज घेण्यापेक्षा सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्याचा सल्ला दिला.

Previous Post

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात

Next Post

‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

'सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली'; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In