Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

हद्दवाढ भागातील नागरिकांना दिलासा मिळणार; गुंठेवारी विकास आणि मोजणी प्रक्रियेला येणार गती

Solapur Mirror by Solapur Mirror
April 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
हद्दवाढ भागातील नागरिकांना दिलासा मिळणार; गुंठेवारी विकास आणि मोजणी प्रक्रियेला येणार गती
0
SHARES
26
VIEWS

नोटरी व्यवहार , टी.पी. 4 योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डसंदर्भात घेतला आढावा

सोलापूर : महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये शुक्रवारी महापौर विनायक कोंडयाल यांच्या अध्यक्षतेखाली हद्दवाढ भागातील गुंठेवारी विकास, मोजणी प्रक्रिया, नोटरी व्यवहार तसेच टी.पी. 4 योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, नगररचना उपसंचालक विनय झगडे, सहाय्यक संचालक शितोळे, मुद्रांक उपजिल्हाधिकारी श्रीराम कोळी, अधिक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके, उपअधिक्षक सचिन पवार, नगरभूमापन विभागाचे अधिकारी व क्रेडाई संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत गुंठेवारी विभागातील नोटरी व्यवहारांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

  • गुंठेवारी संदर्भात महानगरपालिकेकडून भूमी अभिलेख विभागास देण्यात आलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीबाबतही आढावा घेण्यात आला. टी.पी. 4 योजनेअंतर्गत 7/12 उतारे बंद करून प्रॉपर्टी कार्ड तयार करताना येणाऱ्या अडचणींबाबत क्रेडाई प्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला. यावर आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी संबंधित विभागांसोबत पुढील बैठक आयोजित करून ज्या मिळकतींची नोंद अद्याप 7/12 वर आहे, त्या फायनल प्लॉटनुसार तात्काळ प्रॉपर्टी कार्डमध्ये रूपांतरित करण्याबाबत सूचना देण्यात येतील, असे स्पष्ट केले. महापौर विनायक कोंडयाल म्हणाले, हद्दवाढ भागातील नागरिकांना मालमत्तेच्या कायदेशीर प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी महानगरपालिका सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून काम करत आहे. प्रस्तावित शिबिरांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि गुंठेवारी विकास प्रक्रियेला गती मिळेल.

15 एप्रिलपासून हद्दवाढ प्रभागांमध्ये विशेष शिबिरे
या अनुषंगाने 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान हद्दवाढ भागातील प्रभागांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये नगरसेवकांच्या नियोजनाखाली नागरिकांकडून विहित नमुन्यात अर्ज स्वीकारले जाणार असून, नगररचना विभाग, मुद्रांक कार्यालय व भूमी अभिलेख विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही प्रक्रिया राबविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. महापौर कोंड्याल यांनी या उपक्रमास सहमती दर्शवून नगरसेवकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

Previous Post

‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Next Post

“न्यायदेवतेच्या दरबारात सोलापूरचा डंका! JMFC परीक्षेत प्रथमेश शिंदे यांचे देदीप्यमान यश; वकील वर्गात आनंदाचे वातावरण.”

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
“न्यायदेवतेच्या दरबारात सोलापूरचा डंका! JMFC परीक्षेत प्रथमेश शिंदे यांचे देदीप्यमान यश; वकील वर्गात आनंदाचे वातावरण.”

"न्यायदेवतेच्या दरबारात सोलापूरचा डंका! JMFC परीक्षेत प्रथमेश शिंदे यांचे देदीप्यमान यश; वकील वर्गात आनंदाचे वातावरण."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025