सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग २६ अंतर्गत येणाऱ्या जुळे सोलापूर परिसरातील रस्त्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून, हा संपूर्ण भाग खड्डेमुक्त करण्यात येणार आहे. या विकासकामाबाबतची महत्त्वपूर्ण माहिती प्रभाग २६ चे नगरसेवक दीपक जमादार यांनी दिली आहे.
जुळे सोलापूर हे सोलापुरातील एक प्रमुख उपनगर असून, येथील वाढती लोकसंख्या आणि रहदारी पाहता रस्त्यांची दुरुस्ती अत्यंत आवश्यक होती. पावसाळ्यापूर्वी नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने नगरसेवक दीपक जमादार यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळवून दिली आहे.















