Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रेणुका महागांवकर यांचा हृदयस्थ काव्यसंग्रह हृदयात स्थिरावणारा आहे – कवी अशोक नायगांवकर

Solapur Mirror by Solapur Mirror
April 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
रेणुका महागांवकर यांचा हृदयस्थ काव्यसंग्रह हृदयात स्थिरावणारा आहे – कवी अशोक नायगांवकर
0
SHARES
17
VIEWS

कशाचा कशाला संबध नाही असे म्हणत नायगांवकरांनी रसिक श्रोत्यांना खळखळून हसवले

सोलापूर, – कवयित्री रेणुका महागांवकर यांनी लिहलेल्या हृदयस्थ या काव्यसंग्रहातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील घडामोडीचा समावेश असल्याने यातील कविता हृदयात स्थिरावतात असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने अ‍ॅम्फी थिएटर मध्ये रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ या काव्य संग्रहाचे प्रकाशन शनिवार दि. 25 एप्रिल रोजी त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द गायिका सन्मिता धापटे- शिंदे होत्या.

शेकडो वर्षाची मराठी साहित्याची परंपरा मराठीचे वैभव आहे आणि ते पुढच्या पिढीपर्यत पोहोचले पाहिजे. रेणुका महागांवकर यांच्यासारख्या गृहणींकडून कविता लिहल्या जातात आणि सातासमुद्रापार असलेल्या तरूण तरूणींकडून वाचल्या जातात यातच या हृदयस्थ काव्य संग्रहाचा सन्मान आहे. पुर्वीच्या काळात घरात शेतात काम करताना कविता तयार होत होत्या घराघरात बहीणाबाई होत्या परंतु आजच्या काळात क्रॉक्रीट आणि माती असा समाजात दुरावा निर्माण झालेला आहे. मराठी अभिजात करायची असेल तर प्रत्येकाच्या घरात पुस्तके असली पाहिजेत असेही कवी अशोक नायगांवकर यांनी सांगितले. पुस्तकांचा भांडार असलेल्या या लोकमान्य टिळक सभागृहाला तीर्थक्षेत्रच म्हणले पाहिजे आणि अशा वास्तुत काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे आणि रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. याचे कौतुक आहे असेही नायगांवकर म्हणाले.

प्रमुख पाहुण्या सन्मिता धापटे शिंदे यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की, कविता लिहणे म्हणजे स्वतःला उलगडत जाणे. कवितामधून रेणुका महागांवकर यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत असेही त्या म्हणाल्या. त्यानंतर आपल्या मनोगतामधून कवयित्री रेणुका महागांवकर यांनी काव्यसंग्रह लिहताना कसा अनुभव आला आणि साध्या सोप्या भाषेत सर्वसामान्यांच्या जीवनातील घडामोडी कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी सांगितले. शब्दात जादू पेरण्याची ताकद कवी मध्ये असते असेही महागांवकर यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवर आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यांचा सत्कार झाल्यानंतर डिजिटल पध्दतीने रिमोटवरील बटण कवी अशोक नायगांवकर यांच्या हस्ते दाबून कवयित्री रेणुका महागांवकर यांनी लिहलेल्या हृदयस्थ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर हृदयस्थ या काव्यसंग्रहातील कविता अमेरिकास्थित मधुरा गोडबोले,शलाका डोळस, कोल्हापूरच्या प्रियांका पाटील, अहिल्यानगरचे गणेश शिंदे आणि सोलापूरची समृध्दी देशपांडे यांनी कवितांचे वाचन केले. त्यानंतर या काव्यसंग्रहासाठी सहकार्य केलेल्या मुद्रीत शोधक केशव सातपुते, मुखपृष्ठ निशांत पोरे, सविता पाटील, गोविंद काळे, मधुकर पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, पृथा हलसगीकर, प्रकाश मोकाशे, अविनाश महागांवकर, प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर आदींसह पंढरपूर माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, नगरसेवक सात्विक बडवे, उद्योगवर्धीनीच्या चंद्रीका चव्हाण, शुभम महागांवकर,श्रृती महागांवकर,निशा शहा, रसिका बडवे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार माधव देशपांडे यांनी केले

Previous Post

सीईओ कुशल जैन यांचा पदभार स्वीकारताच दणका; पाच विभागांचा आढावा, शिस्तभंग करणाऱ्यांना नोटिसा.

Next Post

यात्रा काळात गोडसे परिवाराकडून भाविकांना थंड पाणी वाटप

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
यात्रा काळात गोडसे परिवाराकडून भाविकांना थंड पाणी वाटप

यात्रा काळात गोडसे परिवाराकडून भाविकांना थंड पाणी वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025