Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

स्थायी समितीत ५.०५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी; २८ रस्ते, सभागृह व विपश्यना केंद्राला हिरवा कंदील

Solapur Mirror by Solapur Mirror
May 9, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
स्थायी समितीत ५.०५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी; २८ रस्ते, सभागृह व विपश्यना केंद्राला हिरवा कंदील
0
SHARES
14
VIEWS

सोलापूर : महापालिका स्थायी समितीच्या सभेत शहर विकासाशी संबंधित विविध चार विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी २० रस्ते , सामाजिक सभागृह , विपश्यना केंद्र व दुरुस्ती कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. मागील तहकूब सभेमधील दोनपैकी ८ रस्ते कामाच्या विषयास मान्यता तर दुसरा विषय फेर सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. चार विषयातील एकूण ५ कोटी ५ लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी दिली.

सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी सायंकाळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सभापती रंजीता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत बुधवार पेठेतील जय मल्हार चौक, मातंग वस्ती येथे सामाजिक सभागृह उभारणे तसेच अमराई येथील आवसे वस्तीतील सिद्धार्थ विहार येथे विपश्यना केंद्र बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या दोन्ही कामांसाठी अनुक्रमे सुमारे ६०.२३ लाख व ५१.६६ लाख रुपयांची पूर्वगणनपत्रके तयार करण्यात आली असून नगर अभियंत्यांची तांत्रिक मान्यताही प्राप्त झाली आहे. दोन्ही कामांसाठी एकत्रित निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून मक्त्याची अंदाजित रक्कम ९२ लाख ६ हजार रुपये इतकी आहे. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या तळमजल्याच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. मनपा पॅनेलवरील स्ट्रक्चरल इंजिनिअर प्रकाश सांगवी यांनी सादर केलेल्या अहवालात संबंधित इमारती व्यावसायिक वापरासाठी अनुपयुक्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन बांधकामासाठी जुन्या इमारती पाडण्यासही स्थायी समितीने मान्यता दिली.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक ५ मधील तब्बल अंतर्गत २० रस्त्यांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली. अंबिका नगर, राजेश्वरी नगर, लक्ष्मी नगर, शिवाजीनगर, केगाव, लोकमंगल विहार, नंदीमठ नगर, गुरुकृपा नगर आदी भागांमध्ये सिमेंट व डांबरी रस्ते करण्यात येणार आहेत. या सर्व कामांची एकूण मंजूर रक्कम १ कोटी ७७ लाख २ हजार ३५४ रुपये इतकी असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्वात कमी दराची निविदा सादर करणारे ठेकेदार सागर बिभीषण भोसले यांच्याकडून ०.२०० टक्के कमी दराने ही कामे करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. करार करून वर्क ऑर्डर देण्यास मान्यता देण्यात आली.

    याशिवाय नगर अभियंता विभागांतर्गत विभागीय कार्यालय क्रमांक ७ साठी सन २०२५-२६ या वर्षाकरिता किरकोळ दुरुस्तीच्या कामांसाठी स्वतंत्र वार्षिक मक्तेदार नेमण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली. ८६ लाख रुपयांच्या निविदेसाठी भानुदास लामकाने आणि रामा दुधाळ या दोन मक्तेदारांची निवड करण्यात आली असून त्यांनी निविदा रकमेपेक्षा १ टक्का कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. या संदर्भात करार करून वर्क ऑर्डर देण्यास मान्यता दिली.

दरम्यान, गुरुवार दि. ३० एप्रिल २०२६ रोजीच्या तहकूब सभेतील दोन विषय चर्चेला घेण्यात आले. त्यापैकी एका विषयास मान्यता दिली तर दुसरा विषय फेर सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन २०२५-२६ अंतर्गत विविध ८ रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याची १ कोटी ८२ लाख ७१ हजार ४३७ रुपयांच्या कामाची निविदा असलेले यासाठी १ कोटी ५० लाख ३३ हजार २७३ रुपयांच्या अंदाजपत्रक रकमेची कामे निविदा धारक अजयकुमार घोडके यांच्याकडून करून घेण्यास व येणाऱ्या खर्चास आणि कार्यारंभ आदेश देण्यासंदर्भात मान्यता देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

Tags: आमदार देवेंद्र कोठेनगरसेवकराजकारणसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

सोलापूर झेडपीचे तत्कालीन सीईओ अरूण डोंगरे यांची अमरावतीचे सेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती

Next Post

आठ दिवसांनी नळाला पाणी; पण गढूळच! सोलापुरात दूषित पाणीपुरवठ्यावर नागरिक संतप्त

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
आठ दिवसांनी नळाला पाणी; पण गढूळच! सोलापुरात दूषित पाणीपुरवठ्यावर नागरिक संतप्त

आठ दिवसांनी नळाला पाणी; पण गढूळच! सोलापुरात दूषित पाणीपुरवठ्यावर नागरिक संतप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025