उद्योगविश्वात यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे एकत्र येणार व्यासपीठ
सोलापूर : ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बीएमआयटी)च्या वतीने माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा ‘अॅफिनिटी २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील हिंजवडी येथील रागा हेरिटेज येथे रंगणार आहे.
माजी आमदार दिलीप माने आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. पृथ्वीराज माने यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, बीएमआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी आज विविध नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदांवर तसेच एचआर म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही या विद्यार्थ्यांचा संस्थेशी असलेला जिव्हाळा आणि अभिमान कायम असल्याचे माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले.


हेच माजी विद्यार्थी आता बीएमआयटी, डिप्लोमा आणि एसपीएमच्या विद्यमान विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने संस्थेसाठी ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘अॅफिनिटी २०२६’साठी नावनोंदणी करण्यासाठी ९१३०१७३४५६ या क्रमांकावर किंवा www.bmitsolapur.org या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे











