Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

श्रीमती शीतल तेली-उगले यांनी स्वीकारला विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार

Solapur Mirror by Solapur Mirror
May 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
श्रीमती शीतल तेली-उगले यांनी स्वीकारला विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार
0
SHARES
7
VIEWS

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज पुणे विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. २००९ बॅचच्या भा.प्र.से. अधिकारी असलेल्या श्रीमती तेली-उगले यांची राज्याच्या क्रीडा आयुक्त पदावरून पुणे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी त्यांचे स्वागत केले.

श्रीमती तेली-उगले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला शाखा पदवी परीक्षेत सुवर्णपदक मिळविले आहे. प्रशासकीय सेवेदरम्यान त्यांनी ‘जलसुरक्षा’ आणि ‘सर्क्युलर इकॉनॉमी’ विषयावरील भारत-ऑस्ट्रेलिया सरकार प्रायोजित विशेष प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. त्यांची प्रशासकीय कारकीर्द नागपूर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून सुरू झाली. त्यानंतर चंद्रपूरचे सहायक जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्त, आयुक्त वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य हातमाग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक, सोलापूर महापालिका आयुक्त तसेच राज्याच्या क्रीडा आयुक्त अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.

रायगड जिल्हाधिकारी असताना महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेदरम्यान त्यांनी केलेल्या सक्षम नेतृत्वाची विशेष दखल घेण्यात आली होती. तसेच ‘डिजिटल इंडिया सप्ताहा’त उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला होता. पणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाच्या काळात महापालिकेला ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट’ आणि ‘हुडको अवॉर्ड फॉर बेस्ट प्रॅक्टिसेस’सह अनेक सन्मान मिळाले. ‘जनाग्रह’ संस्थेच्या मूल्यमापनात पुणे शहराला ‘शहरी प्रशासनातील सर्वोत्तम शहर’ म्हणून मानांकन मिळाले होते.

‘फॅब्रिक ऑफ युनिटी’ मोहिमेची विक्रमी नोंद
महाराष्ट्र राज्य हातमाग विकास महामंडळाच्या कार्यकाळात श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या पुढाकारातून ‘फॅब्रिक ऑफ युनिटी’ मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत ११०० हून अधिक नागरिकांनी हातमागावर ९८ फूट लांबीचे कापड विणले. या उपक्रमाची नोंद ‘आशिया अँड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली.

सोलापूर स्मार्ट सिटीला राष्ट्रपतींकडून सन्मान
सोलापूर महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत असताना २०२३ मध्ये सोलापूर स्मार्ट सिटीला पश्चिम विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते ‘विभागीय स्मार्ट सिटी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. तसेच ‘पीएम स्वनिधी’ योजनेत १२८ टक्के उद्दिष्टपूर्ती करून राष्ट्रीय स्तरावर सोलापूरची दखल घेण्यात आली होती.

Previous Post

जुळे सोलापुरात कलाकारांच्या सूचनांनुसार नाट्यगृह उभारणार ; आ. सुभाष देशमुख यांची ग्वाही

Next Post

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे उद्या पालक पुरस्कारांचे वितरण

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे उद्या पालक पुरस्कारांचे वितरण

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे उद्या पालक पुरस्कारांचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025