Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

28 मे रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ दिवस; 7,222 कर्मचारी तैनात, ग्रामीण–शहरी भागात व्यापक नियोजन

Solapur Mirror by Solapur Mirror
May 26, 2026
in Uncategorized
0
28 मे रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ दिवस; 7,222 कर्मचारी तैनात, ग्रामीण–शहरी भागात व्यापक नियोजन
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर ; सोलापूर जिल्ह्यात पाच वर्षाखालील सुमारे 4 लाख 36 हजार बालकांना पोलिओ लस देण्यासाठी 28 मे रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेने तयारी पूर्ण केली असून एकूण 7,222 कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी 0 ते 5 वयोगटातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले.

निराळे यांनी कोल्ड चेन व्यवस्थापन, वाहनांची उपलब्धता, जनजागृती, प्रसिद्धी तसेच लोकसहभाग वाढविण्यावर भर देत मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन केले. शहरी व ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेने समन्वय साधून प्रत्येक बालकापर्यंत पोहोचावे, तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीद्वारे जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील 5 वर्षाखालील एकूण 4,36,572 बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण भागात 5,570, शहरी भागात 570 आणि महानगरपालिका क्षेत्रात 373 असे एकूण लसीकरण बूथ उभारण्यात आले आहेत. संपूर्ण मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज असून पर्यवेक्षणासाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य अधिकारी नेमण्यात आले आहेत.

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे यांनी सांगितले की, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, विटभट्टी, साखर कारखाने तसेच यात्रा व लग्न समारंभ यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी विशेष लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच भटक्या वसाहती व ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांमध्ये बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईल टीम कार्यरत राहणार आहे.

या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धनंजय वाळा, जिल्हा सांख्यिकी अधिकारी हेमंत पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर महापालिकेकडून बेकायदा बांधकामांवर पुन्हा कारवाईचा बिगुल; बुधवारपासून मोहीम सुरू

Next Post

विद्यार्थ्यांसाठी ; १६ शासकीय वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू.

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
विद्यार्थ्यांसाठी ; १६ शासकीय वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू.

विद्यार्थ्यांसाठी ; १६ शासकीय वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025