Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी ; १६ शासकीय वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू.

Solapur Mirror by Solapur Mirror
May 26, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
विद्यार्थ्यांसाठी ; १६ शासकीय वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू.
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर ; ग्रामीण, दुर्गम आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासकीय वसतिगृहांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. समाज कल्याण आयुक्तालयाच्या २५ मे २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी सोलापूर जिल्ह्यातील १६ शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विहित मुदतीत अर्ज भरावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.

समाज कल्याण विभागाच्या या योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी तसेच मागासवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शहरात राहून शिक्षण घेणे सुलभ होणार आहे. शासनामार्फत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आणि इतर सर्व सुविधा शंभर टक्के मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना मिळणार सर्व सुविधा मोफत
शासकीय वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या राहण्यापासून शिक्षणापर्यंतचा संपूर्ण खर्च शासन उचलणार आहे. विद्यार्थ्यांना दोन वेळचे सकस भोजन, नाश्ता, दूध, फळे, अंडी तसेच आठवड्यातून दोन वेळा मांसाहारी भोजन दिले जाणार आहे.याशिवाय वह्या, पुस्तके, गणवेश, छत्री, रेनकोट, गमबूट यांसारख्या शैक्षणिक साहित्याकरिता अर्थसहाय्य दिले जाणार असून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा निर्वाह भत्ताही जमा केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुसज्ज ग्रंथालय, आधुनिक संगणक लॅब आणि कौशल्यविकासाच्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मुलांची वसतिगृहे :
सोलापूर शहर (२), बार्शी (२), अक्कलकोट (१), माढा (१), पंढरपूर (१), करमाळा (१) आणि अकलूज (१).

मुलींची वसतिगृहे :
सोलापूर शहर (१), अक्कलकोट (१), मोहोळ (१), कुडूवाडी (१), बार्शी (१), पंढरपूर (१) आणि माळशिरस (१).

  • प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर
    समाज कल्याण आयुक्तालयाने विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत.
    इयत्ता ८ वी (शालेय विभाग) – ३० जून २०२६ पर्यंत
    इयत्ता ११ वी व १२ वी – १५ जुलै २०२६ पर्यंत
  • बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. यांसारखे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम – १५ जुलै २०२६ पर्यंत तर इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, लॉ, पॉलिटेक्निक यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनुसार स्वतंत्र वेळापत्रक लागू राहणार आहे.

पात्र विद्यार्थ्यांना लाभ
या योजनेचा लाभ अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विजाभज (VJNT), विशेष मागास प्रवर्ग (SBC), आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. प्रवेश प्रक्रिया सामाजिक आरक्षण व गुणवत्तेच्या आधारे पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सोलापूर अथवा संबंधित शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“कोणाचेही शिक्षण पैशाअभावी थांबू नये”
“उच्च शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या ग्रामीण भागातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांनी शासनाच्या या सुविधेचा लाभ घ्यावा. आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचेही शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध आहे,” असे सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी सांगितले.

Previous Post

28 मे रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ दिवस; 7,222 कर्मचारी तैनात, ग्रामीण–शहरी भागात व्यापक नियोजन

Next Post

बार्शीत ‘मटका किंग’ला पोलिसांचा दणका

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
बार्शीत ‘मटका किंग’ला पोलिसांचा दणका

बार्शीत ‘मटका किंग’ला पोलिसांचा दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In