Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

कारंबा जवळ भीषण अपघात; डंपरच्या धडकेत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Solapur Mirror by Solapur Mirror
June 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
कारंबा जवळ भीषण अपघात; डंपरच्या धडकेत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर | सोलापूर-बार्शी महामार्गावरील उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धोंडाप्पा गुराप्पा जोडमुटे (वय ७०) आणि मल्लिनाथ हिप्परगी (वय ६०) हे दोघे ॲक्टिव्हा दुचाकीवरून कारंबा येथून शेताकडे जात होते. सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास न्यू बंजारा हॉटेलजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या विटांनी भरलेल्या डंपरने (क्र. एमएच २० बीई ४२६६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात धोंडाप्पा जोडमुटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर मल्लिनाथ हिप्परगी हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी हिप्परगी यांना रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी सोलापुरातील स्वीयल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेची नोंद स्वीयल पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

संतप्त ग्रामस्थांकडून डंपरला आग
अपघाताची माहिती मिळताच कारंबा परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. भरधाव डंपरमुळे झालेल्या या भीषण अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. संतप्त झालेल्या नागरिकांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावली. डंपर जळत असताना टायर फुटण्याचे मोठे आवाज परिसरात घुमत होते. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Tags: कारंबाभीषण अपघात
Previous Post

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

Next Post

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा ; शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा ; शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा ; शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025