Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

कोल्हापूर खंडपीठाचा आदेश; आरोपी महिलेला अटकपूर्व जामीन

Solapur Mirror by Solapur Mirror
June 20, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
कोल्हापूर खंडपीठाचा आदेश; आरोपी महिलेला अटकपूर्व जामीन
0
SHARES
97
VIEWS

सोलापूर, : बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी सविता सुरेश चव्हाण (वय ५५, रा. शिवाजीनगर तांडा, केगाव, जि. सोलापूर) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मेहरोज के. पठाण यांनी जामीन अर्ज क्रमांक २३१०/२०२५ मध्ये हा आदेश दिला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा क्रमांक ६९/२०२५ दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुरेश शोभराज चव्हाण, किरण सुरेश चव्हाण, नितीन सुरेश चव्हाण, सविता सुरेश चव्हाण आणि कविता हरिश्चंद्र चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता, पॉक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, मोठ्या बहिणीने सासरचे घर सोडल्यानंतर तिच्यावर बहिणीच्या पतीसोबत विवाह करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. धमकी, मारहाण आणि दबावाखाली अल्पवयीन अवस्थेत विवाह लावून देण्यात आल्याचा तसेच त्यानंतर छळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने सविता चव्हाण यांना विनाकारण गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा दावा केला. त्या फिर्यादीच्या सासू असून कथित घटनेत त्यांचा कोणताही प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे न्यायालयास सांगण्यात आले. या प्रकरणातील सहआरोपी नितीन चव्हाण व किरण चव्हाण यांना यापूर्वी नियमित जामीन मिळाला असून कविता चव्हाण यांनाही अंतरिम संरक्षण देण्यात आले असल्याचे बचाव पक्षाने निदर्शनास आणून दिले.

तसेच अर्जदार वयोवृद्ध महिला असून त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हेगारी पूर्वइतिहास नसल्याचे सांगण्यात आले. फिर्याद कथित घटनेनंतर सुमारे नऊ महिन्यांनी दाखल झाल्याचा मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला. न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करण्याची तयारी असल्याचे अर्जदारातर्फे स्पष्ट करण्यात आले. सरकार पक्षाने अटकपूर्व जामिनास विरोध केला. मात्र दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सविता सुरेश चव्हाण यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. सौरभ तांदळे, ॲड. प्रतिक जाधव, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनिष बाबरे, ॲड. रोहित थोरात, ॲड. संकेत पवार आणि ॲड. त्वरिता वाघ यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षातर्फे ॲड. आनंद साळगावकर यांनी बाजू मांडली.

Previous Post

लाचखोरी प्रकरण गाजले; आरोपींच्या घरांची झडती, लिपिकाचा शोध सुरू

Next Post

विधान परिषदेत राजेंद्र राऊतांची विजयी मुसंडी; महाविकास आघाडीचा धुव्वा”

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
विधान परिषदेत राजेंद्र राऊतांची विजयी मुसंडी; महाविकास आघाडीचा धुव्वा”

विधान परिषदेत राजेंद्र राऊतांची विजयी मुसंडी; महाविकास आघाडीचा धुव्वा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025