Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘प्री वारी- पोस्ट वारी’ संकल्पनेची चर्चा; पंढरीतील स्थायी समिती बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Solapur Mirror by Solapur Mirror
June 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘प्री वारी- पोस्ट वारी’ संकल्पनेची चर्चा; पंढरीतील स्थायी समिती बैठकीत महत्त्वाचे निर्णय
0
SHARES
32
VIEWS

पंढरीत प्रथमच जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा; आषाढी वारीच्या नियोजनाला मिळाली नवी दिशा

पंढरपूर : संतश्रेष्ठ विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरी पंढरपूर येथे प्रथमच सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे झालेल्या या बैठकीत आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सोयी-सुविधा, स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, विविध विकासकामे आणि विभागीय समन्वयाचा सखोल आढावा घेण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व शाळा समितीचे सभापती रामपा चिवडाशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष दीपक वैद्य यांनी आषाढी वारीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करताना, लाखो वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन केले. वारी व्यवस्थापनात स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.सभेदरम्यान समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी मांडलेली ‘प्री वारी’ आणि ‘पोस्ट वारी’ ही संकल्पना विशेष चर्चेचा विषय ठरली. वारीपूर्व काळात स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आणि रस्ते दुरुस्तीचे प्रभावी नियोजन तसेच वारीनंतर तातडीने स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणांचे पुनर्संचयितीकरण करण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी केली.बैठकीत ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागांच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाच्या कामकाजाची माहिती सादर करत आगामी नियोजन मांडले.पंढरपूरमध्ये प्रथमच झालेल्या या ऐतिहासिक स्थायी समिती सभेमुळे आषाढी वारीच्या नियोजनाला अधिक बळ मिळाले असून, स्वच्छ, सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आदर्श वारी घडवून आणण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

पाथरूड चौकातील ‘त्या’ कुटुंबाचा महापालिका आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

Next Post

राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारातुनच समताधिष्ठीत समाज निमिर्ती शक्य- डॉ. गव्हाणे

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारातुनच समताधिष्ठीत समाज निमिर्ती शक्य- डॉ. गव्हाणे

राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारातुनच समताधिष्ठीत समाज निमिर्ती शक्य- डॉ. गव्हाणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025