सोलापूर ; टाळ मृदूगांचा गजर. जय जय विठोबा रखुमाई… सुंदर ते ध्यान उभे विटेवर… जय जय गुरू महाराज गुरू असा भजनाचा जयघोष सुरू होता. महाराजांच्या पाखलीचे दर्शन घेण्यासाठी अबालवृध्द तुळजापूर-सोलापूर रस्त्यांच्या दुर्तफा लोटले होते. महाराजांचे रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी सगळेच आतुर होते. माऊली… माऊली म्हणत प्रत्येकजण पाखलीचे दर्शन घेत होता. हा भक्ती आणि चैतन्य गजानन महाराज पालखी सोहळ्याचा होता. शुक्रवारीसायंकाळी चारच्या सुमाराला पालखी सोहळा सोलापूर जिल्हयातील गंगेवाडी फाटयाजवळे भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी होती. फुलांचा वर्षाव, टाळ घोषाचा निनाद मनाला आनंद व मांगल्य देऊन गेला. लहान थोरांचे हात ओपाआप जोडले जात होते. सायकांळी सहाच्या सुमाराला तळेगावात शेगावीचा राणा गजानन महाराज यांचा सोहळा विसावला, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
पालखी मार्गापासून रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या वॉटरप्रूफ तंबूत वारकरी विसावले. गावकरी यांची लगबग सुरूच होती. स्वयंपाकासाठी अनेकजण झटत होते. भाविकांसाठी तयार होत असलेल्या प्रसादाचा सुंगध, फुलांचा गंध आणि भक्तीचा मेळा जणू विठ्ठल नामात एकरूप झाला होता. प्रशासनाच्या वतीने सोलापूर जिल्हा सीमेवर कासेगावजवळ हद्दीवर झालेल्या या स्वागत सोहळ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सहाय्यक गटविकास अधिकारी सनी चव्हाण, दक्षिण सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलम घोगरे, पंचायत समिती दक्षिण सोलापूरचे सभापती संदीप ढवळे, उपसभापती वर्षा पटणे तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते. पालखीचे स्वागत करण्यात आले .
उद्या कुचनमध्ये मुक्काम पहाटे साडेपाचला पालखी उळेगावातून प्रस्थान ठेवेल. सकाळी साडेसात ते नऊया दरम्यान तळे हिप्परगा येथील मश्रूम गणपती मंदिरासमोर पालखी आल्यानंतर गजानन महाराजांची आरती होती. पन्नास वर्षापासून हा उपक्रम असल्याचे पुजारी संजय पतंगे यांनी सांगितले. दुपारी साडेअकराला पालखी सम्राट चौकातील सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात आल्यानंतर संत भेटीचा सोहळा, आरती आहे. सायंकाळी सहाला पालखी सोहळा कुचन प्रशाला येथे मुक्कामी आहे.
२२ दिवसांचा प्रवास
दोन जून रोजी पालखी शेगाव हुन प्रस्थान ठेवले
२८ जून रोजी सोलापूर जिल्ह्यात आली
७०० वारकरी, त्यापैकी ४०० टाळकरी,
दोन अश्व, नऊ वाहने आहेत
पालखी सोहळा पायी वारीचे यंदा ५६ वे वर्ष आहे
पालखी सोहळ्याचा प्रवास नऊ जिल्हयातून, २२ दिवसाचा व ७५० किलोमीटरचा आहे.
प्रसादाची तयारी जय्यत शंभरहून अधिकजण सकाळपासून भाजी चिरणे, धान्य निवडणे तयारी करीत होते. चपाती, आमटी, भाजी, शिरा, भात, कडक भाकरी असा प्रसाद होता. पाचशेहून अधिक स्वयंसवेक व संपूर्ण गावच तयारीसाठी सज्ज होता. स्वच्छतागृह, सीसीटीव्ही कॅमेरे, गरम पाण्याची सोय, पायाचे मसाज करण्यासाठी मशीनची सोय होती. सायंकाळी पालखी गावात आल्यानंतर आरती झाली. प्रसाद वाटप झाले. दर्शनासाठी गर्दी होती