सोलापूर : श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार, २९ जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ६ वाजता अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी मंदिरातील श्री पंचमुखी परमेश्वर लिंगास व श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या मूर्तीस सहस्त्र बिल्वार्चन, रुद्राभिषेक व वीरतपस्वी ध्यान मंदिरात विश्वशांती व भक्त कल्याणासाठी काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजींची इष्टलिंग संगीत महापूजा होणार आहे.
दुपारी ३ वाजता मठाध्यक्ष चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सम ाजातील गरीब, गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे शिष्यवृत्ती प्रदान व संस्थेतील निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यानंतर महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. भक्तांनी पूज्य महास्वामीजींच्या महापूजा व महाप्रसाद कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.