Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

Solapur Mirror by Solapur Mirror
July 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

सोलापूर : बायोमेडिकल अभियांत्रिकीमध्ये करिअर करण्यासाठी सोलापूर व परिसरातील विद्यार्थ्यांना पूर्वी मुंबईला जावे लागत होते. सोलापुरातील विद्यार्थ्यांना सोलापुरातच करिअरची संधी देण्यासाठी केगाव येथील भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायो मेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात या क्षेत्रात मोठी संधी असल्याने अभियांत्रिकेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी बायोमेडिकलमध्ये करिअर निवडावे, असे आव्हान महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी केले आहे.

गायकवाड म्हणाले की, अत्याधुनिक आरोग्य सेवेतील उपाय विकसित करण्यासाठी ही पदवी महत्त्वाची आहे. वैद्यकीय उपकरणे, निदान उपकरणे विकसित केली जातात. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रत्येक पैलूला या माध्यमातून स्पर्श होतो. या क्षेत्रातील अभियंते एम.आर.आय मशीन, सिटी स्कॅनर आणि पोर्टेबल डायग्रासिस्टिक टूल्स यासारख्या उपकरणाची रचना आणि सुधारणा करत आहेत. याशिवाय हृदय आणि हृदय गती आणि रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीचे निरीक्षण करणाऱ्या स्मार्ट घड्याळ सारखे तंत्रज्ञान बायो मेडिकल अभियांत्रिकीच्या माध्यमातून शिकता येणार आहे.

जटिल वैद्यकीय डेटाचे विश्लेषण करण्यासाठी रोग निदानात मदत करण्यासाठी आणि रुग्णाच्या परिणामाच्या अंदाज घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजंटच्या माध्यमातून उपकरणे विकसित केली जात आहे.बायोमेडिकल अभियांत्रिकीसह एआय हे औषधाच्या निर्मितीकडे नेत आहे. लोकसंख्या वाढत असल्याने प्रगत आरोग्य सेवा उपचाराची मागणी वाढत आहे. बायोमेडिकल अभियंत्याची ही गरज वाढणार आहे. विद्यापीठे आणि संशोधन संस्था त्याच्या जैव वैद्यकीय अभियांत्रिकी कार्यक्रमाचा विस्तार करत आहेत. भविष्यातील करिअरची संधी ओळखून भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाने हा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे.

या अभ्यासक्रमासाठी 63 जागा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या शाखेत प्रवेश घेऊन नव्या क्षेत्रात करिअर घडवावे, असे आव्हानेही संस्था अध्यक्ष गायकवाड यांनी केली आहे. सर्व अभियांत्रिकी साठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. प्रत्येक लॅबमध्ये इंडस्ट्री ग्रेड उपकरणे, अपडेटेड सॉफ्टवेअर, आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. स्मार्ट क्लासरूम मधील डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर ई लर्निंग सॉफ्टवेअर व तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या इंडस्ट्रीमध्ये सहज प्रवेश होतो. तांत्रिक शिक्षणासोबत सादरीकरण कोलेब्रेशन व इनोव्हेशन सारखी कौशल्य विकसित होतात.

असे प्राचार्य डॉ. अनिल देशमाने यांनी सांगितले.संशोधन केंद्रामध्ये प्रचंड संधीपरदेशात उच्च शिक्षणासाठी उत्तम संधी आहे. परदेशात विशेषताः अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, कॅनडा या देशात मोठ मोठ्या कंपनीत बायोमेडिकल इंजिनिअरिंग तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल संशोधन केंद्रामध्ये प्रचंड प्रमाणात संधी आहे.

Previous Post

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

Next Post

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In