सोलापूर : : सरकारी शिक्षकांची बनावट ओळख ( तयार करून त्यांच्या नावे वेतन लाटल्याच्या कथित ‘शालार्थ घोटाळाप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील शिक्षण संस्थेचे प्रमुख व भाजप नेते संजय गरुड याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. नाशिक न्यायालयाने त्याला १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याने एका दिवसात तब्बल १७७ बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून शिक्षणसम्राट संजय गरूड याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीत ६७ वर्षीय गरुडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरुड याच्या भूमिकेबाबत माहिती देताना सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) संदीप मिटके यांनी सांगितले की, गरुड याच्या व्यवस्थापनाखालील एका शैक्षणिक संस्थेशी संबंधित असल्याचे भासवून १५० हून अधिक शिक्षकांची बनावट प्रोफाइल्स तयार करण्यात आली होती.
तपासाची चाहूल लागताच गेला होता जिल्ह्याबाहेर… संजय गरुड याच्या संस्थेच्या जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा तालुक्यात सुमारे १५ ते २० प्राथमिक व माध्यमिक शाळा, दोन कनिष्ठ महाविद्यालये, एक वरिष्ठ महाविद्यालय तसेच काही वसतिगृहे कार्यरत आहेत. एसआयटीने यापूर्वी अटक केलेले तत्कालीन जिल्हा शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर तपासाचा केंद्रबिंदू शेंदुर्णी येथील संस्थेकडे वळल्याचे सांगितले जात आहे. तपासाची चाहूल लागताच संजय गरुड गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याबाहेर निघून गेला होता.
१२ संस्थाचालक रडारवर… या घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यातील दहा तसेच धुळे जिल्ह्यातील दोन शिक्षण संस्थाचालक पोलिसांच्या रडारवर आहेत. याशिवाय जळगाव जिल्ह्यातील १० मोठे शिक्षण संस्थाचालक व चार अधिकाऱ्यांचा पाय खोलात आहे. यातील पाच ते सहा संस्थाचालक मोबाइल बंद करून फरार आहेत. या सर्वच संस्थाचालकांचा अटकेतील आरोपी प्रशांत वाडीले (धुळे) हा एजंट होता. वाडीले यास अटक करण्यात आल्यानंतरच अनेक बड़े मासे गळाला लागत आहे. शिक्षणाधिकारी हिंगोणेकर याच्यानंतर आता गरुड याला 3 पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला या कामात कोणी कोणी मदत केली याबाबत माहिती घेणे बाकी असल्याने त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार त्याला पाच दिवसांची कोठडी देण्यात आली