Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सपकाळांविरोधात राष्ट्रवादीचा ; काँग्रेस भवनासमोर आंदोलन

Solapur Mirror by Solapur Mirror
August 5, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सपकाळांविरोधात राष्ट्रवादीचा ; काँग्रेस भवनासमोर आंदोलन

सोलापूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सोलापुरात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या वतीने बुधवारी काँग्रेस भवनासमोर जोरदार निदर्शने करत सपकाळ यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. घोषणाबाजी आणि प्रतीकात्मक निषेधामुळे परिसर काही काळ दणाणून गेला. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत ते महिलांचा आणि राजकीय संस्कृतीचा अवमान करणारे असल्याचा आरोप केला. कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी केली आणि सपकाळ यांच्याविरोधात संताप व्यक्त केला.

यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते तौफिक शेख पैलवान म्हणाले, “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील जनतेची तसेच सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी.” ते पुढे म्हणाले की, “सुनेत्रा पवार या शांत, संयमी आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविणाऱ्या नेत्या आहेत. मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. महिलांविषयी अशा प्रकारची आक्षेपार्ह भाषा वापरणे कोणत्याही सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारे नाही.”

या आंदोलनात उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष सुवर्णा झाडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रियाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष नागेश पवार, आसिफ राजे, अकिल नाईकवाडी, आबीद सय्यद, अन्वर शेख, सौदागर बाबर, जितेंद्र शिलवंत, सैफू मणियार, अरफात सय्यद, जुनेद दर्जी, दिलीप ननवरे, उत्तर सोलापूर युवक अध्यक्ष नंदकुमार गरड, प्रवीण करंडे, बशीर शेख, हेमंत चौधरी, बंडू मस्के, सुनील चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

घोषणाबाजीने काँग्रेस भवन परिसर दणाणला
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या छायाचित्राला बांगड्यांचा हार घालून प्रतीकात्मक निषेध व्यक्त केला. “माफी मागा… माफी मागा… हर्षवर्धन सपकाळ माफी मागा,” “हर्षवर्धन सपकाळचे करायचं काय… खाली मुंडकं वर पाय,” तसेच “सुनेत्रा ताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा जोरदार घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दणाणून गेला. पोलिस बंदोबस्तात हे आंदोलन शांततेत पार पडले असून, सपकाळ यांनी माफी मागितली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला

Previous Post

ब्रेकिंग : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश; आठजण गजाआड

Next Post

माळढोकामुळे बोरामणी विमानतळ रखडला ; एमआयडीसीसाठी पर्यायावर हालचाली..

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
माळढोकामुळे बोरामणी विमानतळ रखडला ; एमआयडीसीसाठी पर्यायावर हालचाली..

माळढोकामुळे बोरामणी विमानतळ रखडला ; एमआयडीसीसाठी पर्यायावर हालचाली..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In