Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“वाद नको, शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हवा!” – इंद्रजीत पवारांची स्पष्ट भूमिका

Solapur Mirror by Solapur Mirror
August 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
“वाद नको, शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हवा!” – इंद्रजीत पवारांची स्पष्ट भूमिका

सोलापूर, दि. ६ : सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहाचे नामकरण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने करण्याच्या ठरावानंतर निर्माण झालेल्या राजकीय व सामाजिक वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जिल्हा परिषदेच्या आवारातील कोणाचाही पुतळा हटविण्याचा प्रश्नच नसून, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जावा, ही आपली मनापासूनची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थायी समितीच्या बैठकीत शिवरत्न सभागृहाचे नामकरण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने करण्याचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला, तरी विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रशांत बाबर यांनी या निर्णयावर टीका केली असून, संभाजी ब्रिगेडचे शाम कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत ठराव मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.या वादादरम्यान जिल्हा परिषदेच्या आवारातील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुतळ्याबाबतही चर्चा सुरू झाली.

यावर प्रतिक्रिया देताना इंद्रजीत पवार म्हणाले, “कोणाचाही पुतळा हटविण्याचा आमचा कोणताही विचार नाही. जिल्हा परिषदेचा सदस्य आणि उपाध्यक्ष म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की, या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जावा.”पवार यांनी पुढे सांगितले की, जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून स्थायी समितीच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर झाला आहे. देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान नेत्याचे नाव शिवरत्न सभागृहाला देण्यात गैर काय, असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

Tags: अध्यक्षउपाध्यक्षउपाध्यक्ष इंद्रजीत पवारजिल्हा परिषदपुतळावाद
Previous Post

महापालिकेच्या १३० पदांच्या भरतीला राज्य शासनाचा ग्रीन सिंग्नल..!

Next Post

सरवदे हत्याकांड : भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना उच्च न्यायालयाकडून जामीन

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
सरवदे हत्याकांड : भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना उच्च न्यायालयाकडून जामीन

सरवदे हत्याकांड : भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना उच्च न्यायालयाकडून जामीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In