Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पाण्यासाठी सोलापूरकरांचे ‘एक पाऊल पुढे’; ५ हजार ११५ जणांचा ‘वॉक फॉर वॉटर’!

Solapur Mirror by Solapur Mirror
August 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
पाण्यासाठी सोलापूरकरांचे ‘एक पाऊल पुढे’; ५ हजार ११५ जणांचा ‘वॉक फॉर वॉटर’!

सोलापूर, ; . जलसंधारण दिनाच्या निमित्ताने पाणी आणि माती संवर्धनाचा संदेश देत सोलापूरकरांनी शुक्रवारी सकाळी शहराच्या रस्त्यांवर मोठी जनजागृती केली. जलसंधारण सप्ताहाच्या समारोपानिमित्त होम मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’मध्ये तब्बल ५ हजार ११५ नागरिकांनी नोंदणी करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थी, अधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, योगप्रेमी आणि नागरिकांच्या सहभागामुळे होम मैदानासह शहरातील प्रमुख मार्ग जलसंधारणाच्या घोषणांनी दुमदुमून गेले.

दि. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात जलसंधारण सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्याचा समारोप महावॉकेथॉनने करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी जलसंधारणाची सामूहिक शपथ घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉनला सुरुवात केली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी पाणी आणि मातीचे संवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. पावसाचे पाणी अडविणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि जलप्रदूषण रोखणे याबरोबरच जमिनीची धूप थांबविण्यासाठी बांधबंधिस्ती व मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘आपण ज्या पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे पर्यावरणाचे आरोग्यही जपले पाहिजे,’ असा संदेश त्यांनी दिला.

शहरातून जलसंधारणाचा जागर
‘माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकूया. आजची बचत… उद्याचे सुरक्षित भविष्य!’ हा संदेश घेऊन महावॉकेथॉन होम मैदानातून सुरू झाली. डफरीन चौक, सेंट जोसेफ विद्यालय, महात्मा गांधी पुतळा, भैय्या चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर प्रशाला, जिल्हा परिषद पूनम गेट, रंगभवन मार्गे पुन्हा होम मैदान असा पदयात्रेचा मार्ग होता. विविध वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत जलसंधारणाचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थी, अधिकारी अन् नागरिकांचा सहभाग
महावॉकेथॉनमध्ये अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, योगाचार्य विठ्ठल जाधव, कार्यकारी अभियंता रामचंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सप्ताळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. दयानंद महाविद्यालय, संगमेश्वर महाविद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेहरूनगर माध्यमिक प्रशाला, एन. के. ऑर्किड कॉलेज, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय, स्नेह निकेतन कुमठे प्रशाला आदी शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले.

चिमुकल्यांनीही दिला पाण्याचा संदेश
या उपक्रमाचे आणखी एक आकर्षण ठरले ते चिमुकल्यांचा सहभाग. अवघ्या २ वर्षांचा सुदर्श वाघमारे आणि ६ वर्षांची अवनी घोडके यांनीही महावॉकेथॉनमध्ये सहभागी होत जलसंधारणाचा संदेश दिला. त्यामुळे उपस्थितांचे लक्ष या चिमुकल्यांकडे वेधले गेले.

प्रतीक पाकणीकर ठरले लकी
महावॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रतीक पाकणीकर यांची लकी ड्रॉद्वारे निवड करण्यात आली. त्यांना रोख ३ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मेडल देऊन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शना नगारे यांनी केले. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे जनमानसात पोहोचला.

Previous Post

अखेर आकुलवारांची बदली, नगर अभियंता पदाचा ‘चार्ज’ मठपतींकडे!

Next Post

‘श्री स्वामी समर्थ’ विशेषांकाचे वटवृक्ष मंदिरात प्रकाशन

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
‘श्री स्वामी समर्थ’ विशेषांकाचे वटवृक्ष मंदिरात प्रकाशन

‘श्री स्वामी समर्थ’ विशेषांकाचे वटवृक्ष मंदिरात प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In