Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

गावठी कट्टा’ घेऊन फिरणाऱ्याचा गेम ओव्हर ; कर्नाटकातील इसमाला अटक!

Solapur Mirror by Solapur Mirror
August 21, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
गावठी कट्टा’ घेऊन फिरणाऱ्याचा गेम ओव्हर ; कर्नाटकातील इसमाला अटक!

सोलापूर : बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या एका इसमास विजापूर नाका पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व मोटारसायकल असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विजापूर नाका पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख शितलकुमार गायकवाड व पथकातील पोलिस अंमलदार कर्तव्यावर असताना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विजयपूर ते सोलापूर मार्गावर स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक KA28HF2336 वर एक इसम अंगावर रेंगाचे टी-शर्ट व जीन्स पॅन्ट घालून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे घेऊन फिरत आहे.मिळालेल्या माहितीची खात्री करून पोलिस पथकाने पंचांसह संबंधित ठिकाणी कारवाई केली. दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे २.२६ वाजता संशयित इसमास ताब्यात घेण्यात आले.

आरोपी मंजुनाथ शांतप्पा निरणशेट्टी (वय ३१, व्यवसाय-खाजगी नोकरी, रा. मुळपो. शांतेंश्वर गल्ली, इंडी ग्रामीण, ता. इंडी, जि. विजयपूर, कर्नाटक) असे आहे.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे लोखंडी बॉडी असलेले गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व मोटारसायकल असा १ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पिस्तूल बाळगण्याबाबत परवाना आहे का, अशी विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४५५/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ५.२० वाजता अटक करण्यात आली आहे.पोलिस कोठडीत आरोपी मंजुनाथ निरणशेट्टी याच्याकडे गावठी पिस्तूल व काडतुसे कोठून आणली याबाबत चौकशी केली असता, त्याने हे पिस्तूल व काडतुसे इंडी येथील त्याचा मित्र धनश्याम दल्लीचंद जाट याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली असून, संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन पुढील कारवाई सुरू आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजयलक्ष्मी कुर्मी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्रिमत यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.

Previous Post

महिला व मुलींसाठी महापालिकेचे विविध महत्त्वपूर्ण निर्णय

Next Post

विनापरवाना ऑर्केस्ट्रा बारवर मंद्रुप पोलिसांचा छापा; १४ जणांवर गुन्हा

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
विनापरवाना ऑर्केस्ट्रा बारवर मंद्रुप पोलिसांचा छापा; १४ जणांवर गुन्हा

विनापरवाना ऑर्केस्ट्रा बारवर मंद्रुप पोलिसांचा छापा; १४ जणांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In