Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मनपा मराठी मुलांची शाळेत चित्रकला स्पर्धा संपन्न

Solapur Mirror by Solapur Mirror
June 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मनपा मराठी मुलांची शाळेत चित्रकला स्पर्धा संपन्न

सोलापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा मराठी मुलांची शाळा क्र. २८, सोलापूर येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवर आकर्षक आणि कल्पक चित्रे साकारून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. स्पर्धेत बालगट, शालेय लहान गट, शालेय मोठा गट तसेच खुल्या गटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. राजर्षी शाहू महाराजांचे जीवनकार्य, सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि त्यांच्या विचारांवर आधारित चित्रांद्वारे विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडला. स्पर्धेच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळाला असून कला आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. शिक्षक, पालक आणि नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी बुद्धजय भालशंकर सांगितले की, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये कला, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांची निवड करून विजेत्या स्पर्धकांचा लवकरच गौरव करण्यात येणार असल्याची माहिती लोकराजा फाउंडेशनचे संचालक अशितोष तोंडसे यांनी दिली. सह संचालक सागर लोंढे, रोहित लोंढे, यांचे विशेष आभार लाभले.

या वेळी बुद्धजय भालशंकर, आशुतोष तोंडसे, मंजुश्री खंडागळे,सत्यवान पाचकुडवे,विनोद वर,अविनाश भालशंकर, एकनाथ रिकिबे,बी. एन. गायकवाड , प्रशालेचे मुख्याध्यापक परमेश्वर सुतार, गौरीशंकर नारायणी, स्नेहल खराटे, सीमा जाधव,अलका कांबळे, नंदा बागेवाडी, पालक व कर्मचारी आधी उपस्थित होते

“राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि महापुरुषांविषयी आदर निर्माण होतो. मनपा मराठी मुलांची शाळा क्र. २८ येथे झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच प्रेरणादायी असून अशा उपक्रमांना महापालिकेचे नेहमीच सहकार्य राहील.”
— ज्ञानेश्वरी देवकर, उपमहापौर, सोलापूर महानगरपालिका

Previous Post

जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

Next Post

महिनाभरात २०० कोटींचा निधी, विकासकामे मार्गी लागणार – आ. राऊत

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
महिनाभरात २०० कोटींचा निधी, विकासकामे मार्गी लागणार – आ. राऊत

महिनाभरात २०० कोटींचा निधी, विकासकामे मार्गी लागणार – आ. राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In