Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महिनाभरात २०० कोटींचा निधी, विकासकामे मार्गी लागणार – आ. राऊत

Solapur Mirror by Solapur Mirror
June 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महिनाभरात २०० कोटींचा निधी, विकासकामे मार्गी लागणार – आ. राऊत

बार्शी : शहर व तालुक्यात मागील दीड ते दोन वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या विविध विकासकामांना आता गती मिळणार आहे. यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी महिनाभरात प्राप्त होईल, अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, बाजार समितीचे सभापती विजय गरड, पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी रोंगे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. राऊत म्हणाले, बार्शी शहर आणि तालुक्यातील सिंचन योजना, पाणीपुरवठा योजना, गटार, सिमेंट व डांबरी रस्ते, दिवाबत्ती, सभागृहे बांधणे यांसारखी अनेक कामे निधीअभावी रखडली होती. महिनाभरात २०० कोटींचा निधी मिळाल्यावर ही सर्व कामे मार्गी लागतील. या निधीमुळे तालुक्याच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भगवंत मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जासाठी प्रयत्न
बार्शीचे ग्रामदैवत असलेल्या भगवंत मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आ. राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यासाठी सकारात्मक असून, राज्यात अपवादात्मक बाब म्हणून भगवंत मंदिरासाठी १०० टक्के निधी मिळावा, अशी मागणी करणारे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंदिराच्या विकासामुळे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल, असे ते म्हणाले.

पाणीपुरवठा योजना वर्षभरात पूर्ण होणार
शहराच्या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात बोलताना आ. राऊत म्हणाले, टेंभुर्णी ते येडशी या चारपदरी रस्त्याच्या कामामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम रखडले आहे. पूर्वीच्या रस्त्यातूनच पाईपलाईन घेतली असती तर आतापर्यंत पाणीपुरवठा सुरू झाला असता. मात्र, रस्त्याच्या रुंदीकरणामुळे योजनेला उशीर झाला. तरीही येत्या एका वर्षाच्या आत हे काम पूर्ण करून नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा केला जाईल, अशी ग्वाही आ. राऊत यांनी दिली.

जिल्हा बँक निवडणुका ताकदीने लढणार
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीदारांबाबत आ. राऊत म्हणाले, बँकेचे सर्वाधिक थकबाकीदार बार्शी आणि माळशिरस तालुक्यात आहेत. संबंधित थकीत कर्जदारांकडून नियमानुसार बँकेमार्फत वसुली केली जाईल. तसेच, बँकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील आणि त्या निवडणुका आपण पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे सूतोवाचही आ. राऊत यांनी केले.

Previous Post

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मनपा मराठी मुलांची शाळेत चित्रकला स्पर्धा संपन्न

Next Post

ब्रेकिंग : टीईटी चा पेपर फुटला ; मेडिकल विभाग पटोपाट शिक्षण विभाग ही रडारवर

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
ब्रेकिंग : टीईटी चा पेपर फुटला ; मेडिकल विभाग पटोपाट शिक्षण विभाग ही रडारवर

ब्रेकिंग : टीईटी चा पेपर फुटला ; मेडिकल विभाग पटोपाट शिक्षण विभाग ही रडारवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In