सोलापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा मराठी मुलांची शाळा क्र. २८, सोलापूर येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवर आकर्षक आणि कल्पक चित्रे साकारून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. स्पर्धेत बालगट, शालेय लहान गट, शालेय मोठा गट तसेच खुल्या गटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. राजर्षी शाहू महाराजांचे जीवनकार्य, सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि त्यांच्या विचारांवर आधारित चित्रांद्वारे विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडला. स्पर्धेच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळाला असून कला आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. शिक्षक, पालक आणि नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी बुद्धजय भालशंकर सांगितले की, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये कला, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांची निवड करून विजेत्या स्पर्धकांचा लवकरच गौरव करण्यात येणार असल्याची माहिती लोकराजा फाउंडेशनचे संचालक अशितोष तोंडसे यांनी दिली. सह संचालक सागर लोंढे, रोहित लोंढे, यांचे विशेष आभार लाभले.
या वेळी बुद्धजय भालशंकर, आशुतोष तोंडसे, मंजुश्री खंडागळे,सत्यवान पाचकुडवे,विनोद वर,अविनाश भालशंकर, एकनाथ रिकिबे,बी. एन. गायकवाड , प्रशालेचे मुख्याध्यापक परमेश्वर सुतार, गौरीशंकर नारायणी, स्नेहल खराटे, सीमा जाधव,अलका कांबळे, नंदा बागेवाडी, पालक व कर्मचारी आधी उपस्थित होते
“राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि महापुरुषांविषयी आदर निर्माण होतो. मनपा मराठी मुलांची शाळा क्र. २८ येथे झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच प्रेरणादायी असून अशा उपक्रमांना महापालिकेचे नेहमीच सहकार्य राहील.” — ज्ञानेश्वरी देवकर, उपमहापौर, सोलापूर महानगरपालिका