Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन

Solapur Mirror by Solapur Mirror
May 20, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन
0
SHARES
25
VIEWS

इंधन दरवाढी विरोधात घोषणाबाजी; “जनतेला दिलासा द्या”ची मागणी

सोलापूर : वाढती महागाई, इंधनदरवाढ आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक संकटाच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या सोलापूर शहर शाखेच्या वतीने बुधवारी “मोफत बैलगाडी प्रवास” हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष निलेश संगेपाग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. वाढत्या इंधनदरांमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण होत असल्याचा आरोप करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून प्रवास करत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विविध आशयघन फलक हातात घेत सरकारपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. “देशवासियांवर बैलगाडीची वेळ येण्याआधी सरकार जागं व्हा!”, “जनतेच्या खिशाला कात्री, उद्योगपतींना सवलती!”, “जनतेला सल्ले नकोत, दिलासा हवा!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सरकारकडून नागरिकांना काटकसरीचे सल्ले दिले जात असताना दुसरीकडे इंधन, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी शहराध्यक्ष निलेश संगेपाग यांनी केंद्र सरकारने देशहितापेक्षा निवडणुकांना प्राधान्य दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला. “आता आणखी विलंब न करता देशहितासाठी ठाम भूमिका घ्यावी. उद्योगपतींसोबतच नेतेमंडळींनाही त्याग करावा लागेल,” असे ते म्हणाले. माजी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे यांनी पीएम केअर फंड आणि भाजप पक्षाचा निधी देशहितासाठी वापरण्याची मागणी केली.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष एम. पाटील, श्रीकांत वाघमारे, प्राजक्त चांदणे, मल्लिकार्जुन पिलगेरी, सुचित्रा वाघमारे, रहीम शेख, रॉबर्ट गौडर, बसवराज सारंगमठ, मदणी चाचा, प्रसाद बाबानगरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

Next Post

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In