Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वळसंगच्या चौंडेश्वरी यात्रेत ‘बाळबट्टल’ विधी उत्साहात

Solapur Mirror by Solapur Mirror
May 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
वळसंगच्या चौंडेश्वरी यात्रेत ‘बाळबट्टल’ विधी उत्साहात
0
SHARES
6
VIEWS

मध्यरात्रीच्या पारंपरिक सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील वळसंग गावात पारंपरिक श्री रामलिंग चौंडेश्वरी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून यात्रेतील ‘बाळबट्टल’ विधी यंदाही भाविकांचे मुख्य आकर्षण ठरला. हटगार कोष्टी समाजाचे आराध्यदैवत असलेल्या या देवीच्या यात्रेला तब्बल अडीचशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे.यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मध्यरात्री पार पडलेल्या ‘बाळबट्टल’ विधीसाठी वळसंगसह परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्श अमावस्येच्या दिवशी बाळबट्टलला चांदीची वाटी, तलवार, हार, दंडे आणि मुकुटाने सजवले जाते. तसेच सहा विविध रंगांनी त्याचा चेहरा आकर्षक पद्धतीने रंगवला जातो.या विधीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बाळबट्टलच्या पायात तब्बल ४० किलो वजनाचे ३०० घडांचे पारंपरिक घुंगरू बांधले जातात. हे जड घुंगरू परिधान करून सुमारे सात तास चालणारी आणि जवळपास १२ किलोमीटरची गाव प्रदक्षिणा पूर्ण केली जाते.यावेळी “ये तम्मा, बाळबट्टल बत्तरो…”

अशा आरोळ्यांनी परिसर दुमदुमून गेला. हातात मशाली घेऊन गावाबाहेर धावणारे युवक आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरामुळे यात्रेतील भक्तीमय वातावरण अधिकच रंगतदार झाले.या परंपरेला सुमारे २५० वर्षांचा इतिहास लाभला आहे. कर्नाटकातील माशाळ गावातून वीर नावाच्या बालकाने ‘बट्टल’ म्हणजेच चांदीची वाटी वळसंग येथे आणल्याची आख्यायिका सांगितली जाते. माशाळचे लोक ही वाटी परत नेतील या भावनेने ग्रामस्थ रात्रभर जागून तिचे रक्षण करतात.पूर्वी या सोहळ्यात तलवारी आणि इतर शस्त्रांचा वापर केला जात होता. मात्र प्रशासनाच्या नियमांमुळे गेल्या काही वर्षांपासून हा विधी शस्त्रांशिवाय, पण तितक्याच भक्तिभावाने पार पडत आहे. सध्या संपूर्ण वळसंग परिसर रामलिंग चौंडेश्वरी देवीच्या जयघोषाने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाला आहे.

Previous Post

“खेळाडूंना सुविधा द्या, आश्वासन नको!” — मार्कंडेय जलतरण तलावावर खासदार प्रणिती शिंदे यांचा धडक दौरा

Next Post

जि. प. सदस्यांना पहिल्याच सभेत मिळाल्या बॅगा ;प्रशासनाकडून दप्तरांचे वाटप; चर्चेला उधाण

Related Posts

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
Next Post
जि. प. सदस्यांना पहिल्याच सभेत मिळाल्या बॅगा ;प्रशासनाकडून दप्तरांचे वाटप; चर्चेला उधाण

जि. प. सदस्यांना पहिल्याच सभेत मिळाल्या बॅगा ;प्रशासनाकडून दप्तरांचे वाटप; चर्चेला उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025