Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘नागरिकांनी घाबरू नये, सर्वांना न्याय मिळेल’ : आदीला नदी परिसरात अण्णा बनसोडे यांचे आश्वासन

Solapur Mirror by Solapur Mirror
June 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘नागरिकांनी घाबरू नये, सर्वांना न्याय मिळेल’ : आदीला नदी परिसरात अण्णा बनसोडे यांचे आश्वासन

सोलापूर : सोलापूर शहरातील आदीला नदी परिसरातील रेड लाईन, नदी विकास आराखडा आणि बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर आता राज्यस्तरावर तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधान परिषदेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी आदीला नदी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंधारे विभाग, महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली.आदीला नदी परिसरात पाटबंधारे विभागाकडून नदी सुधारणा आणि रेड लाईन निश्चितीचे काम सुरू आहे.

मात्र या प्रक्रियेमुळे परीसरातील अनेक नागरिक, शेतकरी आणि मालमत्ता धारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य बाधित होणाऱ्या कुटुंबांनी आपल्या मालमत्ता आणि भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.या पार्श्वभूमीवर अण्णा बनसोडे यांनी प्रशासनाची भूमिका समजून घेत नागरिकांशी संवाद साधला. सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कोणताही धोरणात्मक निर्णय किंवा मंत्रालयस्तरीय बैठक घेणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आचारसंहिता संपताच मंत्रालयात संबंधित विभागांची संयुक्त बैठक बोलावून हा विषय मार्गी लावला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.आदीला नदी विकासाच्या कामामुळे कोणत्याही नागरिकाचे अन्यायकारक नुकसान होऊ दिले जाणार नाही.

प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि बाधित नागरिक यांच्यात समन्वय साधून सर्वांना न्याय मिळेल असा मार्ग काढला जाईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, बिंदास राहावे,” असे आश्वासन अण्णा बनसोडे यांनी दिले.दरम्यान, या दौऱ्याचे आणि बैठकीचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केले होते. त्यांच्या पुढाकारामुळे बाधित नागरिकांना आपली बाजू थेट उपसभापतींसमोर मांडण्याची संधी मिळाली. या बैठकीमुळे आदीला नदी प्रकरणाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

वंदे मातरमच्या लपलेल्या इतिहासावर सोलापुरात १४ जूनला व्याख्यान

Next Post

दिवस-रात्र घरफोड्या करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
दिवस-रात्र घरफोड्या करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद

दिवस-रात्र घरफोड्या करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In