Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सचिवांच्या बदल्यांना देशमुखांचा विरोध; तातडीने आदेश रद्द करण्याची मागणी

Solapur Mirror by Solapur Mirror
August 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सचिवांच्या बदल्यांना देशमुखांचा विरोध; तातडीने आदेश रद्द करण्याची मागणी

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहकारी संस्थांच्या सचिवांच्या बदल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी या बदल्यांबाबत जिल्हा उपनिबंधकांना पत्र देत प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीन सहकारी संस्थांच्या सचिवांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, आमदार विजयकुमार देशमुख यांनी यापूर्वी सहकारी संस्थांच्या सचिवांच्या बदल्यांबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे मागणी केली होती. मात्र, या मागणीवर अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे सुभाष देशमुख यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव सोसायटीचे संपत बिराजदार, तीळगाव आणि होटगी सोसायटीचे पीरसाब अमलीचुंगे तसेच बाळगी आणि औज एम. सोसायटीचे राजकुमार सगरे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित सचिवांना अद्याप बदलीचे आदेश प्रत्यक्ष मिळालेले नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर बदल्यांवरून वाद
सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सचिवांच्या बदल्या झाल्याने या निर्णयाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. त्यामुळे या बदल्यांना तातडीने स्थगिती देऊन पूर्वीची परिस्थिती कायम ठेवावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे. या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Tags: आमदार विजयकुमार देशमुखआमदार सुभाष देशमुखजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेदक्षिण सोलापूरनिवडणुकसंचालक मंडळसहकारी संस्थां
Previous Post

विनापरवाना ऑर्केस्ट्रा बारवर मंद्रुप पोलिसांचा छापा; १४ जणांवर गुन्हा

Next Post

लेकच्या शिक्षणविश्वात आईचीही ‘एन्ट्री’; संवादातून विश्वासाचा अनुबंध

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
लेकच्या शिक्षणविश्वात आईचीही ‘एन्ट्री’; संवादातून विश्वासाचा अनुबंध

लेकच्या शिक्षणविश्वात आईचीही ‘एन्ट्री’; संवादातून विश्वासाचा अनुबंध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In