सोलापूर : पुण्यश्लोक अ हिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदवी आण ि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुख झाली आहे. कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नावीन्यपूर्ण आणि व्यावसायिक कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

बी.एस्सी. (कॉम्प्युटर एन्व्हायर्नमेंटल सायन्स फार्मास्युटिकल), बी.ए. (मीडिया) बी. कॉम. सारख्या अभ्यासक्रमांसाठी बा रावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट प्रवेश मिळेल. बीसीए, बीबीए, एम.एस्सी (के मिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, मॅथ्स) एम.ए. (मास कम्युनिकेशन) यांसाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. ५ वर्षांचा इं टि ग्रेटेड ‘एम. टेक इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी’ आण ि ‘अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम’ हे या वर्षीचे आकर्षण आह े अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www sus.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्र-कुलगुरू प्रा डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले आहे.











