Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

Solapur Mirror by Solapur Mirror
June 3, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

रिक्त पदभरती, वेतन, बदली आणि पेन्शनसह विविध प्रलंबित मागण्यांबाबत आदर्श शिक्षक समितीची शिक्षणाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा

सोलापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्याच्या मागणीसाठी आदर्श शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी शिक्षकांच्या सेवा, वेतन, पदोन्नती, बदली आणि पेन्शनशी संबंधित अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले.

समितीच्या वतीने जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी वर्ग-३, श्रेणी २ व श्रेणी ३, केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांची रिक्त पदे आचारसंहिता संपताच तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली. दीर्घकाळ रिक्त असलेल्या पदांमुळे शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले. जनगणना कार्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांच्या वेतनातून वाहन भत्ता कपात करू नये, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. तसेच इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याबाबतचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करून संबंधित शाळांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

अतिरिक्त समाजशास्त्र शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडविण्यासह शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य असताना परीक्षेसाठी स्वतंत्र प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया बंद करावी, अशी सूचनाही समितीने केली. अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती प्रकरणांमध्ये पेन्शन मंजुरीसाठी येणारे अडथळे दूर करून प्रकरणे जलदगतीने निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष रमेश घंटेनवरू यांनी समायोजन झालेल्या शिक्षकांना तत्काळ बदली आदेश देऊन त्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता व्यक्त केली. शिक्षकांच्या विविध अडचणींबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत, संबंधित विषयांवर शासनाच्या धोरणानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

चर्चेनंतर शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून शिक्षण विभागाच्या पुढील भूमिकेकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

Next Post

पर्यावरण दिनी अवैध तोड झालेल्या ११८ झाडांना श्रद्धांजली

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
पर्यावरण दिनी अवैध तोड झालेल्या ११८ झाडांना श्रद्धांजली

पर्यावरण दिनी अवैध तोड झालेल्या ११८ झाडांना श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In