Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बार्शीत ‘मटका किंग’ला पोलिसांचा दणका

Solapur Mirror by Solapur Mirror
May 28, 2026
in सोलापूर शहर
0
बार्शीत ‘मटका किंग’ला पोलिसांचा दणका
0
SHARES
26
VIEWS

पिसे बंधूंसह सहाजण जुगार अड्ड्यावर जेरबंद; रोख रक्कम, मोबाईलसह लाखोंचा ऐवज जप्त

बार्शी : बार्शी शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम सुरू ठेवत मुंबई-कल्याण मटका जुगार अड्ड्यावर मोठी धाड टाकली. उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने केलेल्या या कारवाईत पिसे बंधूंसह सहा जणांना रंगेहात पकडण्यात आले असून, रोख रक्कम, मोबाईल हँडसेट व जुगार साहित्य असा एकूण सुमारे १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मंगळवारी (दि. २७ मे) सायंकाळी सहाच्या सुमारास शहरातील तेल गिरणी चौक परिसरात रमाकांत पिसे यांच्या सायकल दुकानाजवळील आडोशात मुंबई-कल्याण मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार निर्भया पथकाने अचानक छापा टाकत जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत माजी नगराध्यक्ष श्रीकांत पिसे यांचा मुलगा अजिंक्य श्रीकांत पिसे, माजी नगरसेवक सोमनाथ पिसे यांचा मुलगा गणेश पिसे यांच्यासह सुदेश पांडुरंग कोळपे (सुभाषनगर), विजय दत्ता गवळी (खुरपे बोळ), अमोल भास्कर पवार (राऊत चाळ) आणि दिनकर अर्जुन कांबळे (तांदुळवाडी रोड, कळंब) या सहाजणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ अंतर्गत कलम १२-अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून २२ हजार रुपये रोख, पाच मोबाईल हँडसेट तसेच जुगारासाठी लागणारे साहित्य जप्त केले. कारवाईत निर्भया पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब घाडगे, हनुमंत पाडुळे, नम्रता गटकुळ तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब महानोर यांनी सहभाग घेतला. दरम्यान, पिसे बंधूंवर यापूर्वीही मटका जुगारासंदर्भात अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. संघटित स्वरूपातील ही गुन्हेगारी अनेक वर्षांपासून सुरू असल्याने त्यांच्यावर ‘मोका’सारखा कठोर कायदा लागू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे बार्शीतील अवैध धंद्यांना चाप बसत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Previous Post

विद्यार्थ्यांसाठी ; १६ शासकीय वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू.

Next Post

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In