Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

माजी खासदार गंगाधर कुचन यांचे निधन

Solapur Mirror by Solapur Mirror
May 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
माजी खासदार गंगाधर कुचन यांचे निधन
0
SHARES
9
VIEWS

सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेत्याची काळाच्या पडद्याआड; देहदानाचा कुटुंबीयांचा निर्णय

सोलापूर : सोलापूरचे माजी खासदार तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते विणकररत्न गंगाधरपंत सिद्रामप्पा कुचन (वय ९१) यांचे मंगळवारी पहाटे पाच वाजता अश्विनी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या राजकीय, सहकारी आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. गंगाधरपंत कुचन यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पद्मानगर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले असून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयास देहदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

सोलापूरसह महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गंगाधरपंत कुचन यांनी राज्यातील सुमारे २३ सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले. १९८० आणि १९८५ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते काँग्रेस पक्षाकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते. १९९० मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांनी १९९१ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर काही काळाने पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी विविध क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध पक्षांतील राजकारणी, सहकारी संस्था आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असत.

अश्विनी सहकारी रुग्णालय, मार्कंडेय सहकारी रुग्णालय, नागरी बँका, पतसंस्था, सूतगिरण्या तसेच विडी घरकुल उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. पूर्व भागातील अनेक शिक्षण संस्थांच्या उभारणीत, विशेषतः पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. गेल्या पंधरा वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असले तरी वृत्तपत्र वाचन, विविध क्षेत्रातील घडामोडींचा अभ्यास आणि सहकार संस्थांना मार्गदर्शन करणे हे कार्य ते सातत्याने करत होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते.

त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे आणि जावई असा परिवार आहे.

Tags: गंगाधर कुचनमाजी खासदार
Previous Post

A.D. जोशी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यावर दुःखाचा डोंगर; सांगोला तालुक्यात हळहळ

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यावर दुःखाचा डोंगर; सांगोला तालुक्यात हळहळ

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यावर दुःखाचा डोंगर; सांगोला तालुक्यात हळहळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025