Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

Solapur Mirror by Solapur Mirror
May 20, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!
0
SHARES
2
VIEWS

भारतातील पहिला व्यावसायिक डीएमई उत्पादन प्रकल्प सोलापुरात सुरू; ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल

सोलापूर : बालाजी अमाईन्स कंपनीने चिंचोळी एमआयडीसी येथील युनिट-४ प्रकल्पामध्ये डायमिथाईल इथर (डीएमई) उत्पादन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित करत २० मे २०२६ पासून व्यावसायिक उत्पादनास प्रारंभ केला आहे. या कामगिरीमुळे व्यावसायिक स्तरावर डीएमईचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी ठरली आहे. डीएमई हे एलपीजीमध्ये मिश्रण करून वापरता येणारे स्वच्छ आणि कार्यक्षम पर्यायी इंधन मानले जाते. अनेक पाश्चिमात्य आणि युरोपीय देशांमध्ये एलपीजीमध्ये २० टक्क्यांपर्यंत डीएमईचे मिश्रण वापरले जाते. कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दरवर्षी १ लाख मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प उभारला असून आवश्यक मूलभूत अभियांत्रिकी तंत्रज्ञान परदेशी कंपनीकडून प्राप्त करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले की, “हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.” भारतासाठी डीएमई उत्पादन पूर्णपणे नवीन असल्याने बीआयएसने नुकताच नवीन आयएस कोड जारी केला असून त्यानुसार एलपीजीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत डीएमई मिश्रण करता येणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी डीएमई मिश्रण उपक्रमासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. जागतिक ऊर्जा क्षेत्रातील वाढती अनिश्चितता लक्षात घेता पर्यायी इंधनांचा विकास ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. डीएमईच्या वापरामुळे भारताचे एलपीजी आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतामधील हा पहिलाच डीएमई उत्पादन प्रकल्प असल्याने उत्पादन साठवण, हाताळणी, वापर, वाहतूक आणि रोड टँकरद्वारे परिवहन यांसंदर्भातील भारतीय मानकांचा अभाव असल्यामुळे पीईएसओ परवानग्या आणि इतर वैधानिक मंजुरी मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी कंपनी एरोसोल उद्योग तसेच इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये हीटिंगसाठी इंधन म्हणून डीएमईचा पुरवठा करणार आहे. या उद्घाटन समारंभास पूर्णवेळ संचालक एन. राजेश्वर रेड्डी, वरिष्ठ महाव्यवस्थापक गोविंद मेंचेकरे तसेच महाव्यवस्थापक विनय दुर्गम उपस्थित होते.

दरम्यान, कंपनी भविष्यात ईव्ही बॅटरी केमिकल्स क्षेत्रातही मोठी झेप घेण्याच्या तयारीत असून वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी काही विद्यमान प्रकल्पांची पुनर्रचना करून नव्या पिढीतील ईव्ही बॅटरी केमिकल्स उत्पादनावर भर दिला जाणार असल्याची माहिती डी. राम रेड्डी यांनी दिली.

Previous Post

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

Next Post

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In