Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जेसीबीने पुष्पवृष्टी आणि क्रेनचा हार; रंजिता चाकोते यांच्या निवडीचा सोलापुरात ‘शाही’ जल्लोष!

Solapur Mirror by Solapur Mirror
March 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जेसीबीने पुष्पवृष्टी आणि क्रेनचा हार; रंजिता चाकोते यांच्या निवडीचा सोलापुरात ‘शाही’ जल्लोष!
0
SHARES
5
VIEWS

बिनविरोध निवड! सोलापूर पालिकेत चाकोते युगाचा प्रारंभ.

सोलापूर : सोलापूर महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रंजिता चाकोते यांचे बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अठरा मिनिटांच्या निवड प्रक्रियेनंतर चाकोते यांचा एकमेव अर्ज असल्याने पिठासीन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. त्यानंतर महापालिका आवारात क्रेनच्या सहाय्याने भव्य हार घालून तसेच चार जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करत पर्यावरण पूरक जल्लोष साजरा करण्यात आला.

सोलापूर महापालिका स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडीची सभा पिठासीन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी निवड प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची उपस्थिती होती. पिठासीन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्याकडे सभापती पदासाठी दाखल करण्यात आलेले नामनिर्देशन पत्र महापालिका नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी सादर केले.

  • भाजपच्या रंजीता चाकोते यांचे दोन अर्ज प्राप्त झाले होते. पिठासीन अधिकारी यांनी छाननी करून दोन्ही अर्ज वैध असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सकाळी 11: 03 वाजता पिठासीन अधिकारी यांनी सभेच्या नियमाप्रमाणे अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला. त्यानंतर पंधरा मिनिटांनी सकाळी ठीक 11.18 वाजता विहित वेळेत अर्ज मागे घेतला नाही. सभापती पदासाठी चाकोते यांचा एकच अर्ज प्राप्त झाला आहे. त्यामुळे मतदान घेण्याची आवश्यकता नाही. यामुळे रंजीता चाकोते यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात येत असल्याची घोषणा पिठासीन अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केली. त्यानंतर उपस्थित स्थायी समिती सदस्यांनी या निवडीचे स्वागत केले.सभापतीपदी बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर रंजीता चाकोते यांचा महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका तथा भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर , महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे , स्थायी समिती सदस्य, नगरसेवक- नगरसेविका यांच्यासह नातेवाईकांनी त्यांचा सत्कार केला. दरम्यान, यावेळी महापालिका आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हे आहेत स्थायी समितीचे १६ सदस्य
सत्ताधारी भाजपच्या १४ जणांपैकी चाकोते यांना चेअरमन पदाची संधी मिळाली आहे. भाजपचे १४, एमआयएमचा आणि शिंदे सेनेचा प्रत्येकी एक असे स्थायी समितीमध्ये पक्षीय बलाबल आहे. भाजपचे अविनाश पाटील, सतीश सिरसीला, रंजीता चाकोते, गणेश वानकर, भारतसिंग बडूरवाले, सत्यनारायण गुर्रम, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, जयकुमार माने, शिवाजी वाघमोडे, कल्पना कदम, राजू पाटील, अमर पुदाले , बिज्जू प्रधाने तर एमआयएमचे अझहर हुंडेकरी आणि शिवसेनेचे अमोल शिंदे आदी स्थायी समिती सदस्य आहेत.

Previous Post

डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या नेतृत्वाखाली घुमणार ‘जय श्रीराम’चा नारा

Next Post

माणुसकीचे दर्शन: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाचवला अपघातग्रस्त चालकाचा जीव

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
माणुसकीचे दर्शन: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाचवला अपघातग्रस्त चालकाचा जीव

माणुसकीचे दर्शन: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाचवला अपघातग्रस्त चालकाचा जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025