Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जागतिक परिचारिका दिनी सोलापुरात नवजीवनाचा आनंद; परिचारिकांच्या सेवेतून सात बाळांचा जन्म..!

Solapur Mirror by Solapur Mirror
May 14, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
जागतिक परिचारिका दिनी सोलापुरात नवजीवनाचा आनंद; परिचारिकांच्या सेवेतून सात बाळांचा जन्म..!
0
SHARES
16
VIEWS

सोलापूर : जागतिक परिचारिका दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिका हद्दीतील विविध प्रसूतीगृहांमध्ये नवजीवनाचे आगमन झाले असून दिवसभरात एकूण सात बाळांचा जन्म झाला. परिचारिकांच्या सेवाभावी वृत्ती, तत्परता आणि मायेच्या स्पर्शामुळे अनेक मातांना सुरक्षित प्रसूतीचा अनुभव मिळाला. या विशेष दिवशी शहरातील शासकीय प्रसूतीगृहांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहात एका मुलीचा जन्म झाला. दत्ताशा प्रसूतीगृहात दोन मुलींनी जन्म घेतला, तर गावभाग प्रसूतीगृहात एका मुलाचा जन्म झाला. जिजामाता, चांदणी, रामवाडी आणि सावळे प्रसूतीगृहात दिवसभरात प्रसूतीची नोंद झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.जागतिक परिचारिका दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून रुग्णसेवेत दिवस-रात्र झटणाऱ्या परिचारिकांच्या योगदानाला मानवंदना देण्याचा दिवस मानला जातो. डॉक्टरांप्रमाणेच परिचारिकाही आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहेत.

विशेषतः प्रसूती विभागात काम करणाऱ्या परिचारिका मातांसाठी आधारवड ठरतात. गर्भवती महिलांची काळजी घेणे, प्रसूतीवेळी मानसिक धीर देणे आणि नवजात बालकांची निगा राखणे ही अत्यंत जबाबदारीची कामे त्या निष्ठेने पार पाडतात.सोलापुरातील विविध प्रसूतीगृहांमध्ये कार्यरत परिचारिकांनी आजच्या दिवशी विशेष दक्षता घेत प्रत्येक मातेला योग्य उपचार आणि काळजी दिली. अनेक कुटुंबांसाठी हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. नवजात बालकांच्या आगमनामुळे रुग्णालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी बालकांच्या नातेवाईकांनी परिचारिकांचे आभार मानत त्यांचा सत्कारही केला.कोरोना काळातही परिचारिकांनी जीवाची पर्वा न करता सेवा बजावली होती. त्या काळात त्यांच्या कार्याचे महत्त्व संपूर्ण जगाने अनुभवले. आजही त्या तितक्याच समर्पित भावनेने आरोग्य सेवा देत आहेत. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या महिलांनाही परिचारिकांकडून चांगले मार्गदर्शन आणि मदत मिळत असल्याचे अनेकांनी सांगितले.महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानेही जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांच्या कार्याचे कौतुक केले. “रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा” या भावनेतून परिचारिका आपले कर्तव्य पार पाडत असून त्यांच्या योगदानामुळे आरोग्य यंत्रणा सक्षमपणे उभी आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सोलापुरातील आरोग्य व्यवस्थेत परिचारिकांचे योगदान मोठे असून अनेक रुग्णांसाठी त्या आशेचा किरण ठरत आहेत. नवजात बालकांच्या जन्मामुळे आजचा दिवस अधिक खास ठरला असून परिचारिका दिनाचे औचित्य साधत शहरात नवजीवनाचा आनंद साजरा करण्यात आला. अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी राखी माने यांनी दिली आहे..

Previous Post

हद्दवाढ भागातील १२ गावांचा मालमत्ता प्रश्न सुटणार; वर्षभरात मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’!

Next Post

​पीडिता तिथेच, विनयभंग करणारा शिक्षकही पुन्हा त्याच शाळेत; सोलापूरच्या नामांकित शाळेचा संतापजनक अट्टाहास!

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
​पीडिता तिथेच, विनयभंग करणारा शिक्षकही पुन्हा त्याच शाळेत; सोलापूरच्या नामांकित शाळेचा संतापजनक अट्टाहास!

​पीडिता तिथेच, विनयभंग करणारा शिक्षकही पुन्हा त्याच शाळेत; सोलापूरच्या नामांकित शाळेचा संतापजनक अट्टाहास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In