Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे

Solapur Mirror by Solapur Mirror
June 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर | सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ कार्यक्रम सोमवारी शहरातील विविध मनपा शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. सचिन ओम्बासे यांनी मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक २८ येथे भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असा संदेश त्यांनी दिला. या प्रसंगी प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने उपस्थित होते. तुळजापूर वेस येथील महानगरपालिका मुलांची शाळा क्रमांक २ येथे स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी उपस्थिती लावली. तसेच मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक ४ येथे सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका अश्विनी चव्हाण व वनिता पाटील यांनी प्रवेशोत्सवात सहभाग घेतला. यावेळी नरेंद्र काळे यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

शहरातील विविध मनपा शाळांमध्ये नगरसेवक, नगरसेविका तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त पवीणा पवार, मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त सोनाली यादव, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीष पंडित आणि मनीषा मगर यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. प्रवेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक मनीष बांगर, सुरेश कासार, संतोष बुलबुले, रजनी राऊळ, निलोफर शेख तसेच केंद्रीय मुख्याध्यापकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यंदाच्या प्रवेशोत्सवात नवागत विद्यार्थ्यांचे विविध शाळांमध्ये अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर काही शाळांमध्ये खास बग्गीची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी पालकांना मनपा शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रशिक्षित शिक्षकवर्ग आणि विविध शैक्षणिक सुविधांची माहिती देण्यात आली. डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले, “शिक्षण हा समाज परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. प्रत्येक बालकाने नियमित शिक्षण घेणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पालकांनी मनपा शाळांवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे.”

Previous Post

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

Next Post

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे - जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025