Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

Solapur Mirror by Solapur Mirror
May 19, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, सोलापूर जिल्ह्यातील ‘आमदारकीची लॉटरी’ अखेर कुणाला लागणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने २५ मे ते २५ जून दरम्यान आचारसंहिता लागू केली असून, १८ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद आणि नगरपंचायतीतील लोकप्रतिनिधी असे एकूण ६१६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने या निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. एकूण ६१६ मतदारांपैकी तब्बल ३१३ मतदार भाजपकडे असल्याने निवडणुकीत पक्षाची ताकद निर्णायक मानली जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

‘हेवीवेट’ इच्छुक रिंगणात
भाजपकडे स्पष्ट वर्चस्व असल्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. माजी आमदार राम सातपुते, प्रशांत परिचारक, राजन पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, राजेंद्र राऊत तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार यांची नावे चर्चेत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते अखेर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याची उत्सुकता जिल्हाभर शिगेला पोहोचली आहे.

या मतदारसंघातून निवडून आलेले दिग्गज
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून यापूर्वी इनुस शेख, सुभाष देशमुख, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील आणि दीपक आबा साळुंखे यांनी विधान परिषदेवर प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाला जिल्ह्याच्या राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

‘सुगीचे दिवस’ परतल्याची चर्चा
सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये मतदार असलेल्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती आणि नगराध्यक्ष यांच्यासाठी ‘सुगीचे दिवस’ आल्याची चर्चा रंगली होती. यंदाही त्याच चर्चांना पुन्हा उधाण आले असून, राजकीय लॉबिंगला वेग आल्याचे चित्र आहे.

आचारसंहितेमुळे विकासकामांना ब्रेक
गेल्या चार वर्षांपासून महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींवर प्रशासक होते. काही महिन्यांपूर्वीच या संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा होती. २२ मे रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठकही आयोजित करण्यात आली होती. मात्र, विधान परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने आता पुन्हा किमान महिनाभर विकासकामांना ब्रेक लागणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Previous Post

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

Next Post

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025